उत्तररात्र- १

-एय, एक गोष्ट सांग नं.

-गोष्ट? आता?

-हं..

-ओके, (विचार करतो, डोकं खाजवतो) एक होता सॉफ़्टवेयर टेस्टर..

-मी सांगू मी सांगू पुढे काय होतं? त्याला एक बग खूप त्रास देतो..

-हैला, तुला कसं माहित?

-एक बोट पकड (दोन बोटांपैकी एक बोट पकडतो)

-कारण तुझं नवं व्हेंचर सुरु झाल्यापासून मला तू हीच गोष्ट एक होता प्रोग्रामर, डिबगर, टिम लीडर अशी सांगतोयेस

-असं?

-हो

-(थोडा वेळ शांत, मग अचानक) दुसरं बोट काय होतं?

-(मनापासून हसते)गोष्ट?

-ओके, आज मी तुला एक ब्रॅंड न्यू गोष्ट सांगतो.

(मांडी घालून, मांडीवर उशी घेऊन गोष्ट सांगायला सुरुवात करतो)
-एक होतं आटपाट नगर. आटपाट नगरातील एका कदंबाच्या झाडावर कावळ्यांची कॉलनी होती..

-कदंब?

-खरंतर आटपाट नगरातील एका कदंबाच्या झाडावर कावळ्यांची कॉलनी होती असे म्हटल्यावर आटपाट नगरातदेखील कावळे राहायचे एव्हढाच अर्थबोध होतो. तू-मी  कसले हरखलो होतो नाही- चेन्नईला कावळे बघितल्यावर? तिथले कावळे आपल्या कावळ्यांपेक्षा बिलकुल वेगळे नाहीत , तेवढेच काळे आहेत पहिल्यावर? (अचानक आठवल्यासारखं) तू  उद्या डोसे काढशील का?
(ती जोरात चिमटा काढते)

-आऊच..नखं काप ती बये.  हां. तर ते कदंब बिदंब सोड. माणसांच्या साहित्य सहवास कॉलनी सारखं पक्ष्यांचं कदंब.

-हां, ते साहित्य सहवास  माहितेय मला.

(एक क्षण तिच्याकडे बघतो आणि मग गोष्ट पुन्हा सुरु करतो)
-तर त्या कावळ्यांच्या वसाहतीत एक वेगळा, धडपडा कावळा रहात असतो. आपल्या गोष्टीत कावळा म्हटला की..

-कावळी आलीच आणि ती देखील तेवढीच वेगळी आणि धडपडी असणार. आय नो, गो  ऑन.

-शहाणी गं माझी बाय ती. आता गोष्ट तूच पूर्ण कर ना, मला जाम झोप येतेय.

-(ती खरंच पुढे गोष्ट सांगायला घेते) ती दोघं लिव्ह-इन मध्ये राहत असतात.

-(झोपलेला उठून बसतो) ये हुई ना बात! इंटेरेस्टींग. पुढे?

-कावळा सतत काहीतरी नवीन, जगावेगळं करण्याच्या प्रयत्नात असतो, त्याची नेमकी हीच गोष्ट आवडत असल्याने कावळीचाही त्याला पूर्ण सपोर्ट असतो.

-तुझं लेमन तिरामिसु गंडलेलं तेव्हा इतरांसमोर तुझी वाहवा करुन मी दिलेला तसा..

-(त्याच्याकडे पूर्ण दुर्लक्ष करुन) तर "कावळ्याचं घर होतं शेणाचं" "कावळ्याचं घर गेलं वाहून" या मिडीयॉकर गोष्टीचा त्याला इतका भयंकर वैताग यायचा की एके दिवशी त्याने चिमणीचं मेणाचं घर काय झक मारेल असं घरटं बनवायचा घाट घातला. साहजिकच आहे त्याने ही योजना सर्वात पहिल्यांदा कावळीला सांगीतली.

-एमेफ़ीईओ नाही?

-(पुन्हा एकदा दुर्लक्ष करुन)असा प्रयत्न त्याआधीही एका धडपडया कावळ्याने केला होता पण ते कावळेमहाशय एके दिवशी पतंगाच्या दोराला अडकून स्वर्गाकडे प्रस्थान करते झाले.

-हं

-तर आपल्या धडपड्या कावळ्याने त्या कैलासवासी कावळ्याच्या बायकोकडून घरट्याचा प्लॅन, ब्लू-प्रिंट मिळवली आणि साहित्याची जमवाजमव करायचं काम कावळीला दिलं.

-लेमन तिरामिसुसाठी छप्पन्न डी-मार्टस आणि स्पेन्सर्स मी पालथी घातली तशी..

-(आता गोष्ट ओघवती येते आहे, त्याच ओघात) कावळीने उत्साहात ते काम करायला सुरुवात केली. पहिल्यांदा तिने ती ब्लू-प्रिंट नजरेखालून घातली, त्यातली प्रत्येक गोष्ट, त्या गोष्टीचा बारकावा समजून घेतला. घरटी बांधण्यात तज्ञ अशा अनेक कावळ्यांशी ती बोलली. ते घरटं अधिकाधिक चांगलं कसं करता येईल या विचारात तिचा पूर्ण वेळ जायला लागला.

-मग?

-कोकाकोलाचे स्ट्रॉ तकलादू म्हणून तिने मॅकडी आणि केएफ़सीचे स्ट्रॉ जमवले, त्यासाठी प्रत्येक आऊटलेट रोज पालथी घातली. टिकाऊपणासाठी लहान, सुक्या काटक्यांऐवजी मोठ्या, लवचिक काटक्या जमवल्या. सगळं सामानसुमान जमा झालं तसं तिने कावळ्याच्या समोर नेऊन टाकलं. तिची अपेक्षा अशी की कावळा तिला जवळ घेईल, चार स्तुतीचे शब्द बोलेल.

-नाही बोलला का?

-छे! त्याने ती थंडगार एकाक्षी नजर तिच्यावर टाकली आणि विचारलं,"हे काय?" कावळी म्हणे, "सामान" त्यावर कावळा विचारता झाला, "पण मी तुला कोकाकोलाचे स्ट्रॉ सांगीतले होते, हे कुठलेतरी भलतेच आहेत. शिवाय काटक्याही किती जाड आहेत" यावर कावळीने त्याला तिने कसा ब्लू-प्रिंट्सचा अभ्यास केला आणि त्यात काय-काय सुधारणा करता येण्यासारख्या आहेत हे शोधून काढलं हे सांगायला सुरुवात केली. यावर कावळ्याने अतिशय उर्मटपणे तिला थांबवलं आणि विचारलं, "तुला म्हणायचंय काय?"

-(गोष्ट ऐकण्यात गर्क. हं म्हणायचं भान नाही)

-कावळी हिरमुसली पण ती नेटाने सांगत राहिली. तिने सांगून संपल्यावर कावळा फ़क्त एवढंच बोलला "मला काय करायचंय हे मला चांगलं माहितेय आणि त्याचा पूर्ण विचार करुनच मी तुला सामान जमवायला सांगीतलं. तुला जेवढं सांगीतलंय तेवढं कर, त्याचं पुढे काय करायचंय याचा विचार तुला करायचं काहीच कारण नाही. नाहीतर असं कर नां, तू काही करुच नकोस, सामानही मीच जमवतो"

-बिच्चारी कावळी!

-हो नं. ती सदिच्छेने काहीतरी करायला गेली आणि त्याचा विचका झाला आणि तो दुसरया कोणी नाही तर आपल्याच धडपड्या कावळ्याने केला.

-मग काय झालं?

-आता गोष्ट तू पूर्ण कर मग मी डाळ-तांदूळ भिजत घालते.

-उम्म..मग काय, कावळ्यावरच्या प्रेमाखातर तिने त्याच्या सांगण्याबरहुकुम सारे काही केले असेल नाहीतर..

-मेबी.. काय रे? तू तेलाचा डबा आणलास? नाही आणलायेस तर डोसे विसर.

-तर तर, आणलाय. ऐक ना,  नाहीतर आपल्या कावळीसमोर पुढे मागे स्वतंत्रपणे, तिला हवं तसं घरटं बांधण्याचा पर्याय असेलच ना? नक्कीच. अरे हो, ते तेलाचं सांगायचं राहिलंच. यावेळी आपलं नेहमीचंच सनफ़्लॉवर नाही आणलं, सफ़ोला आणलं-लो कोलेस्ट्रॉल, हार्ट केयर ऑईल, मस्त नं?.

-(प्रचंड ऑफ़ होऊन) का? तू सफ़ोला का आणलंस?

-(अजून गोष्टीतच रमलेला) अं?

-अरे,  तुला जेवढं सांगीतलंय तेवढंच करायला काय होतं? मी सनफ़्लॉवर आण म्हटल्यावर सनफ़्लॉवरच आणायचं, स्वत:ची अक्कल पाजळायची नाही. एक काम करतोस तेही धड करता येईना तुला..
(बोलता बोलता थांबते, दचकते आणि हिरमुसलेल्या त्याच्याकडे पाहात राहते)

(तो अचानक काहीतरी समजल्यासारखा.. पण सावरुन, समजुतीने)
-नाही राणी. मला काय वाटतंय माहितेय का? आपल्या गोष्टीचा शेवट "कावळ्यावरच्या प्रेमाखातर तिने त्याच्या सांगण्याबरहुकुम सारे काही केले असेल." असाच व्हायला हवा. कावळीला स्वातंत्र्य नकोय, कावळाच हवा असेल तर शेवट तसाच होणे योग्य, नाही? काय म्हणतेस?

(ती गप्प, तो व्यग्र. पहाट व्हायला अजून भरपूर अवकाश आहे)

26 comments:

Himali said...

hahaha chaan aahe katha.. agadi aajchya kalat suit hoil ashi.. :)

Eat & Burpp said...

aga kasli mast jamli ahe..kadhi kadhi mazi ani Yogesh chi honari bhandana athavli...nehemich lakshat rahil....zakkas zali ahe! Nicely related!

Nil Arte said...

अग मुली आपण "स्टफ" चॅनलाइझ करण्याबद्दल बोललो होतो...
पण इतक्या फास्ट आणि सरस 'कालवा' निघेल वाटलं नव्हतं मला...
आदल्या जन्मी पाटबंधारे खात्यात होतीस की काय? तशी पण अजित पवारांची जागा मोकळी झालीय :)

Shraddha Bhowad said...


@ हिमाली,
मत्प्रिय सखे, कैसी पतेकी बात बोली तुम.

Shraddha Bhowad said...

@ गीता,
धन्यवाद! बेसिकली, तुझा आणि योगेशच रेपो पाहता(ऐकून-वाचून असलेला) तुमच्यात भांडणं होत असावीत ही कल्पना देखील विनोदी वाटते. पण वाटणे आणि असणे मध्ये फ़रक तर असतोच. यू नो द्यॅट!

Shraddha Bhowad said...

निळ्या,

आता हा पाट इतक्या भसासा आणि तोही इतक्या लवकर कसा वाहायला लागला ह्याचं कारण मी काय देऊ? हॅव यू एव्हर बीन हर्ट सो बॅड्ली? याचे तुझ्यापुरता उत्तर मला माहित असल्याने ’इतक्या लवकर कसं?’ हा प्रश्न तुला का पडावा हा प्रश्न मला पडलाय फ़्रॅंकली.

बाकी ’कालवा’ वरची कोटी लय भारी. आवडली आपल्याला. पाटबंधारे खात्यात जाऊन लॉंग टर्मकरता पाट काढण्यात आणि काहीतरी वाहते करण्यात अजिबात रस नाही अरे!

Anonymous said...

लगेच संपली गोष्ट. पण प्रश्न सुरु झालेत. तुला माझ्या मनात प्रश्न तयार करायला छुपे रस्ते कुठून मिळतात?
मला सलणारे तुझ्या प्रतिमा, थोडा चकवा खूप खूप आवडतो.. तू लिहलेलं सर्वच आवडतं.

Shraddha Bhowad said...

दुरित,
मी कधी़च खोटं बोलत नाही, आय ऍम फ़्लॅटर्ड!

<<तुला माझ्या मनात प्रश्न तयार करायला छुपे रस्ते कुठून मिळतात?

प्रश्न तयार थोडीच होतात? ते छानपैकी, कोपरा-टू-कोपरा ओव्हरलॅप होतात फ़क्त. ते असतातच आधीपासून. मी त्यावरुन चालत गेल्यावर थोडे स्पष्ट दिसत असतील तेव्हढंच काय असेल ते. :)

aativas said...

ती, तो आणि त्यांच नातं .. सगळ्यांबद्दल प्रश्न आले .. आणि विरलेही :-)

Shraddha Bhowad said...

आतिवास,
:)
सुटले का?

प्रसाद said...

गोष्ट आणि गोष्टीतली गोष्ट फारच झकास ...
गोष्टीच्या प्रवाहात वाहात वाहात अचानक जाणता अजाणता वास्तवाच्या समेवर येणं मार्मिकपणे टिपलं आहेस.
ही तुझी पहिलीच ब्लॉग पोस्ट वाचतोय. पण ही पोस्ट वाचून बाकीच्या पोस्ट्स वाचणे ओघाने येणारच आहे.

Shraddha Bhowad said...

पश्या, ( :) )

तुझ्या नावाला रायमिंग म्हणून मला वाश्याच आठवलं. :D

असो,

बाकी कमेंटबद्दल थॅंक्स. आजच्या धकाधकीच्या जीवनात वगैरे तू वेळ काढून कमेंट वगैरे लिहून कळवलंस त्याबद्दल लईच धन्यवाद इत्यादी.

माझ्या कथेतलं हे असलं काय काय तुझ्यासारखी माणसं शोधून काढतात ना..तेव्हा मला प्रचंड अचंबा वाटतो. म्हणजे लिहीताना एवढे सारे आस्पेक्ट्स डोक्यात असतात असं नाही (हे खरं की खोटं? ) म्हणजे असतीलही पण सबकॉन्शसमध्ये! पण ते असे पूर्णच्या पूर्ण उलगडून आले ना..जसे की
<<गोष्टीच्या प्रवाहात वाहात वाहात अचानक जाणता अजाणता वास्तवाच्या समेवर येणं ..

किंवा

<<गोष्ट आणि गोष्टीतली गोष्ट

मस्त वाटतं.

वाचत रहा..कळवत रहा.

Vidya Bhutkar said...

Hi Shradhha,
Came to your blog thru your post on 'Reshevarachi akshare'.And then read almost last 1 year's posts. I liked to read your blog. I hope you are continuing to post every now and then. keep writing.
-Vidya.

Ashish Phadnis said...

अगं बयो...आहेस तरी कुठे...महिने झाले तुझी एकही नविन पोस्ट नाही...
एवढे मोठे पॉजेस नको घेत जाऊस..

Vikram Virkar said...

Lay bhaari lhilay.. Nakki kuthlya shabdat sangava te nay suchat pan naadkhula ahe.. Kitvyanda tari vachla an punha tyach intensely aat kuthetari pochala.. Waiting for more..

Shraddha Bhowad said...

आशिष,
नाही घेणार. :) रोजमर्रा के झमेले-दुसरं काय अरे? :)
पण, लिहीते आहे-दररोज-फ़क्त टायपायला वेळ मिळत नाहीये.
नवी पोस्ट कमिंग सून. :)

Shraddha Bhowad said...

विक्रम,
:)
नादखुळावर मी इतकी हसले-तुझ्या पहिल्या मेलच्या वेळी हसलेले तितकीच-किंबहुना त्याहून कितीतरी जास्त. :D
आय गेस शब्दांनी तुला पहिल्यापासूनच सॉलिड टांग मारलिये, नाही का?
नीवेज, वाचतोयेस ते भिडणं महत्वाचं आणि समोरच्याला भिडणारं काहीतरी आपण लिहून गेलोय ह्याची पोचपावती मला मिळणं माझ्या दृष्टीने महत्वाचं.
असंच कायम होत राहो हे माझ्यातल्या इवल्या-सानुल्या लेखिकेचं विशफुल थिंकींग.:)

Shraddha Bhowad said...

विद्या,
हो, मी लिहीत राहणार आहे-कायम.
थॅंक्स !
आणि उत्तर देण्यात इतका उशीर झाला त्याबद्दल क्षमस्व मे. तुझा ई-मेल शोधत होतो. उशीर झाल्याची कसर मेल करुन भरुन काढू म्हणून पण तो काही मिळाला नाहीच.
असो.

Unknown said...

Mastch!!!

Shraddha Bhowad said...

महेश,
थॅंक्स!

Unknown said...

Khup chan lihiley.mast....keep it up.

Shraddha Bhowad said...

मुकु़ंद,
कमेण्टला उत्तर द्यायला उशीर झालाय त्याबद्दल क्षमस्व मे!
आणि थॅंक्स अ टन!

Sudhakar......... said...
This comment has been removed by the author.
Sudhakar......... said...
This comment has been removed by the author.
Sudhakar......... said...

सतीश तांबेनीं फेबुवर शेअर केलेल्या पोस्टमुळे इथं पोहोचलो आणि बघता बघता सगळा ब्लॉगच वाचून काढला.. व्यक्त होणं तुला जमलंय आणि आपल्याला असं जमलं असतं तर मजा आली असती असं वाटून गेलं. असो. लिखाण transparent आहे अगदी त्या मुराकामीच्या बेकरी कथेतल्या बोटीखालच्या नितळ पाण्यासारखं. खूप खूप शुभेच्छा :)

Shraddha Bhowad said...

सुधाकर,
माझा मंदार गद्रे नावाचा मित्र आहे/होता, त्याच्या पोस्टवरच्या कमेण्ट अशाच पिसासारख्या हलकं करुन अस्मानापर्यंत वगैरे पोहोचवणा-या असायच्या. मी त्याला नेहमी म्हणायचे की तुझ्या कमेण्ट्सनी फॅंटा प्यायल्यानंतर टाळूच्या इथे सुखद शॉट बसावा तसं होतं.
तुमची कमेण्टही त्यातलीच आहे.
नेहमी कमेण्ट करत जा राव!
थॅंक्स!
-श्रद्धा

 
Designed by Lena