मो.मोडॉनेय-पुन्हा.


आताशा सगळ्यांना झालंय तरी काय?

पक्षी तारेवर समसमान अंतरावर बसत नाहीत.
पाखरांना, फ़ुलपाखरांना डिस्लेक्सिया झाल्यासारखा वाटतो. माझ्या गाडी्समोर वेगाचा अंदाज चुकून हरघडी धडपडत असतात हल्ली.
कुकरच्या शिट्टीच्या हिस्स्स्स्स्ने गाठलेले पार तार सप्तक
खारीची बडबड वाढलिये,
या खारीची समजूत कशी काढावी हेच मला समजेनासे होते.
कालपरवापर्यंत मजेत डोलायचे ते तीन दिवसांत झुरुन मेलेलं  वांझ झाड
आकाशात हल्लीहल्लीच दिसायला लागलेले वेडेविद्रे, हिंस्त्र आकार
डोकं आणि पाय धरुन हे sssss ताणल्यावर दिसेल तशी तिन्ही त्रिकाळ दिसणारी अभद्र सावली.
फ़िल्टरमधून येणारा एक्स्ट्रा रागावलेला ग्ळ्ळ्ळ्म्ग्ळ्ळ आवाज. (भर पाणी आणि फ़ूट एकदाची)
सगळेच जण वैतागल्यासारखे वाटतायेत.
छान छान असल्याचा, पर्फ़ेक्ट असल्याचा आव आणून कंटाळल्यासारखे वाटतायेत

तिन्ही त्रिकाळ डोळ्यातले दिवे विझलेली माणसेच माणसे दिसतात.
यांच्या डोळ्यातले ला‌ईट्स गेले तरी कुठे?
यांच्या डोळ्यातली लुकलुक चोरुन नेणारा ’पूट-आ‌ऊटर’ नेमका कुठे असतो?
लोकांना ’इसेन्स’मध्ये रस नाही उरलेला, फ़ालतू माहितीत मात्र अजूनही आहे.
लोकं हल्ली वेदनेला सामोरे जात नाहीत. वेदनेला ’स्यूडो’ बनवून पिल्स ऑफ़ विस्ड्म घेणं मात्र वाढलंय. आपण काय आणि कसं गमावलेय हे त्यांना कळत तरी असेल का?
डोळ्यात बघून स्वच्छ बोलणारया माणसांची जमात नाहिशी होण्याच्या मार्गावर आहे.

माणसांना हल्ली अटॅचमेंटस नको असतात.
म्हणजे हव्या असतात, अलबत! पण त्यांना पहिले ’नको’ म्हटलं तर exclusivity वाढते असं त्यांना वाटत असतं.
आणि खरंच आहे की ते-
आधी मिळणार नाही म्हणून शक्यतांना जागाच ठेवू नये आणि अकस्मात ते मिळावं नव्हे त्या समोरच्याने ते उदारहस्ते दे‌ऊ करावं याने असा खूप खूप छाती फ़ुटून जाते कि काय असं वाटायला लावणारा आनंद नाही का होत? होतो नं-आधी घडलेलं सर्व पुसून टाकत, त्याने दे‌ऊ करण्या‌आधी आपणच मागीतलं होतं हे सपशेल विसरुन जात?
पण समोरच्याने ’नको’ म्हणावं आणि मीदेखील हट्टाला पेटून ’कसं नाही मिळत मला बघतेच मी’ म्हणून हट्टाला पेटावं.
शी! कसले गेम्स आहेत हे?
पण असे खेळ खेळले जातात. हररोज, प्रत्येक क्षणी.

मी लिहीते त्यातले काय चूक आणि काय बरोबर? हे मला ठा‌ऊक नाही. आज बरोबर वाटतंय, उद्या वाटेलच याची शाश्वती नाही.
दुसरा आपल्याबद्दल काय समज करुन घे‌ईल याची काळजी आपल्याला का वाटते? मुळातच जी गोष्ट आपल्या हातात नाही त्याबद्दल डोकेफ़ोड का करुन घ्या? तुम्ही समोरच्यापर्यंत जसं पोहोचायचं तसंच पोहोचता. तो त्याच्या सोयीचं तेव्हढंच आणि तसंच बघतो. लोकं आपल्याला त्यांना जसं बघायचं आहे तसंच बघत असणार, त्या गोष्टीवर आपली सत्ता चालत नाही. यावर असेही म्हणता ये‌ईल की इतकं स्पष्टीकरण देण्याची, दुसरयांना महत्व देण्याची इतकी गरज का वाटते? कारण त्यांना वजा करुन सिच्यु‌एशन समजून घेता येत नाही म्हणून. ती दुसरी माणसं तिथे तशी आहेत आणि असणारच आहे्त हे एकदाचं मान्य करुन टाकण्यात शहाणपणा आहे. आपण डोळे झाकून घेतलेस म्हणून ती तिथे असायची थांबणार आहेत असं होत नसतं.

यावर कधीकाळी कासवर पुरलेली पत्रे अवचित आठवली. फ़क्त माणसांना पुरायचं, आठवणींना का नाही? म्हणून पुरुन टाकलेली.
अक्षरं मातीत मिसळून जाताना त्यांचं काय होत असेल हा प्रश्न नेहमीच पडायचा. मला वाटायचं की कटू शब्दांमधून निवडुंगाचे फ़ड उभे राहतील आणि गोड शब्दांतून...पण दोघांतूनही एकाच प्रकारची फ़ुले उगवलियेत-अश्रुंची फ़ुले! एकच निर्वाणीचा टपोरा अश्रु छाताडावर वागवणारी-
त्या एका अश्रूनंतर आपण आपण आयुष्याचं जे काय करायचं ते करुन घेतोच. नाही का?

या डोळ्यांत बघणारया- न बघणारया, डिटॅच्ड असणारया-नसणारया, डिस्लेक्सिक, अडिस्लेक्सिक पाखरे, डोकं उठवणारी खार‌ आणि या सगळ्यांशी फ़टकन अटॅच होणारया माझं मी काय करायचं अं?
काय करायचं?
की काहीच करायचं नाही?

हे सारं कोणालातरी भेटून बोलावे अशी सोयही नाही उरलेली. ते माणूस जा‌ऊन बसलेय आमच्या बोडक्यावर त्या तिथे आकाशात चांदणी बनून. आता त्याने आमच्यासाठी आकाशगंगेच्या बाजूचं प्रा‌ईम लोकेशन बघून ठेवलेलं असावं इतकीच इच्छा. बाकी सगळं तर हाय काय आणि नाय काय.

मीच कधीकाळी लिहीलेलं एक वाक्य आठवलं
आठवणी या ’इंटरप्रीटेशन्स’ असतात, रेकॉर्ड्स नाही.
तुम्हाला माहितेय का माहित नाही पण आपण आपल्या आठवणींना (आठवणींना बरं- इंटरप्रीटेशन्सना नाही) काळानुसार ऑल्टर करत जातो. त्यात आपल्या सोयीची एक्स्प्लेनेशन्स घालतो, प्रसंग पार ट्विस्टेड करुन सांगतो, काल्पनिक संवाद-प्रसंग त्यात घुसडतो. का? तर खूप दुखत असतं आत कधीकधी ते जास्त दुखू नये म्हणून, रडणं कमी करता यावं म्हणून, आपल्या ब्लंडर्सची आपल्यालाच लाज वाटते म्हणून..त्यात वा‌ईट आहे का? मला वाटतं नाही कारण हा कामूफ़्लाजचा प्रकार आहे. कामूफ़्लाज ही नैसर्गिक प्रेरणा आहे-सर्व्हायव्हलसाठी! पण होतं काय- आपण दुसरयांना तीच एडिटेड व्हर्जन्स सांगत असतो. मग ती सांगता सांगता आपल्याच डोक्यात इतकी पक्की बसतात की आपण तीच खरी मानून चालायला लागतो. खरं-खोटं, बनवलेलं काय-वास्तव काय ह्यामधली ती रेषा पार मिटून जाते. मग आपण त्या ऑल्टर्ड व्हर्जन्सनाच आपल्या आठवणी मानून चालायला लागतो. कारण शहानिशा करण्या‌इतका मेबी इतका टा‌ईम आपल्याकडे नसतो किंवा तेव्हा त्याची गरज वाटत नाही. अशा ऑल्टर्ड आठवणींच्या इंटरप्रीटेशन्सना (कशीही) तसाही काय अर्थ असतो? फ़ावल्या वेळचा विंझणवारा-याशिवाय काही नाही.

आपण जुना रंग न खरवडता त्यावर नवीन रंग मारतो, मग तो जुना झाला की त्यावर आणखी एक थर, मग आणखी आणि मग आणखी एक..याला अंत असा नाहीच. पण त्याने होतं काय की मूळ रंग कोणता होता हे आपलं आपल्यालाच सांगता येत नाही, कितीही डोक्याला ताण द्या. पण त्याने अस्वस्थ व्हायला होतं का? माझं उत्तर आहे-नाही. आपल्याला आताच्या रंगाशी मतलब असतो. मग आपण आताचा रंग लक्षात ठेवू मे बी पुढच्या रेफ़रन्सकरता पण तो मूळचा जुना रंग पार विस्मृतीत जातो. अगदीच नेट लावून पाहायचा म्हटला तर तो पार आतपर्यंत खरवडून काढायला लागतो. आताच्या रंगाला पूर्णपणे विस्कटत. भिंतीलाही दुखतं, रंगालाही दुखतं, आतल्या रंगामध्ये धुगधुगी असेलच तर त्यालाही दुखेलच. तो पाहून कससंच झालंच आणि तो डोळ्यावेगळा करायचा म्हटला तरी त्या खरवडण्याचा ठसा ती भिंत कायम अंगावर वागवणार असते, तुम्ही नंतर कितीही पॅच मारा.

ही सारी सारी कन्फ़्युजन्स अटळ असतात पण ती अन-कन्फ़्युज करण्याचा प्रयत्न करणं ऑप्शनल असतं. असं अन-कन्फ़्युज असलं की कसं छान छान चाल्लंय असा फ़ील येतो, उगाच. ओल्ड मॉंकची एक पिंट संपवली मेंदूवर एक तरल पडदा येतो तसं. आयुष्य़च हॅग-ओव्हर मध्ये काढायचं का मग? कल्पना छान आहे, पण हा पुन्हा ज्याचा त्याचा चॉ‌ईस.
हा माझा चॉ‌ईस, दुनिया ग‌ई तेल लगाने किंवा रास्ता नापने किंवा असंच काहीतरी.

Signing off!
Peace.



11 comments:

लिना said...

"........."

Anonymous said...

.....
स्केअर्ड, ज्याला लागायला हवं, त्याला लागलंय..

मी तडका-फडकी वादळात लटकत राहतो, मात्र. bye

Shraddha Bhowad said...

लिना,

".., ..... ....."

Shraddha Bhowad said...

दुरित,

<<मी तडका-फडकी वादळात लटकत राहतो, मात्र.

काहून?

aativas said...

<< आताशा सगळ्यांना झालंय तरी काय? >>

म्हणजे आपल्यासकट ना?
चालायचंच - 'याला जीवन ऐसे नाव'वगैरे :-)

Shraddha Bhowad said...

:) हो, किनरया आवाजात म्हटलेलं ’जीवन एक संघर्ष है’ वगैरे सेंटी गाणं..
कितीही यक्क्क आणि क्लिशेड असलं तरी उचकीसारखं आठवतंच. :)

yogik said...

punha punha wachtoy.camouflage wagaire !! bharich.

yogik said...

punha punha wachtoy.camouflage wagaire !! bharich.

Shraddha Bhowad said...

योगिक,
फ़ारा दिवसांनी(की वर्षांनी?) तुझी कॉमेंट पाहिली. Glad!
धन्यवाद!

Ashish Phadnis said...

श्रद्धा तु कायबाय लिहीत जातेस...मनात आलेल्या विचारांना स्कॅन करून त्याची प्रिंटआउट मारल्यासारखी...पण इथे वाचकांची पंचाईत होते ना...कधी असं वाटतं की आपल्याला हे सगळं कळतयं...कुठेतरी तुला रिलेट होतोय...पण कधी वाटतं..की छ्या हे सगळंच वेगळं आहे...आपल्या डोक्यावरून शेकडो फूट उंचावरून जाणारं...
तु जशी आठवणींची इंटरप्रिटेशन्स म्हणतेस ना तशी वाचताना पण आपली इंटरप्रिटेशन्स होत असतात...आणि मूळ लिखाणाचा आपल्या इंटरप्रिटेशन्सशी ताळमेळ जमत नाही तेव्हा फार अस्वस्थ व्हायला होतं...
तुला हे असं काही सुचतं आणि नुसतं सुचत नाही तर ते लिहायला जमतं याच फार कौतुक वाटतं...इथे शब्द डोक्यात गर्दी करतात आणि एका लाईनीत त्यांना खेचायला जावं तर कुठेतरी निसटून जातात...पुन्हा आपली पाटी कोरीच...
तु अशीच लिहीत जा....

Shraddha Bhowad said...

आशिष,
लिहीते आहे, लिहीत राहीन.
बाय द वे, तुझ्या कमेंट्स वाचल्या की पोटात फ़ुलपाखरं छानपैकी तिरकिटधा करत नाचतात बघ. :D
Loved your comment.

 
Designed by Lena