जागेपणीच्या कविता नं-२

काल..आज..

आज फ़ारा दिवसांनी पाऊस पडला,
जसा काय श्रावणातलाच होता..
पण आज-आता श्रावण नाही.

खिडकीतून दिसणारया आकाशाची बोटभर चिंधी
कालच्यासारखी आरस्पानी निळी दिसतेय,
आजची झाडं कालच्यासारखीच दिसतायेत,
पण ती कालची नाहीत.

माणसंही तीच, काल होती ती.
आज कालच्यापेक्षा नव्याने कळतायेत.

शब्द कालचेच वाटतायेत..
पण अर्थ नव्याने उगवून आलेत.
स्पर्शही तसेच पण,
नव्याने आंदुळत जातायेत.

आरशातली ’मी’ सुद्धा कालच्यासारखीच,
पण कालची नाही.
नव्याने उमटलेली.

कालचे ’मी’पण आज नाही तरी,
आजचं ’मी’पणही ’मी’पणच..
पण कालच्यासारखे उनाड नाही.
आजचे उद्याला असेल?

4 comments:

Ketaki Abhyankar said...

mast jhalay ekdam

Shraddha Bhowad said...

य्ये! माझी कविता is no more अनाथ.
थॅक यू केतकी. मला वाटलं कोणलाच झेपली नाही की काय!

BsHrI said...

ekdam jhakkas aahe.........

केसु said...

mastach...

 
Designed by Lena