रोज संध्याकाळ होताना..

क्लॉद इस्तेबान.
फ़्रेंच कवी आणि निबंधकार. म्हणजे ७०% निबंधकार आणि ३०% कवी.
कवी म्हणून अगदीच आडूमाडू नाही पण तरीही बरयाच जणांना माहीत नसलेला.
’फ़्रेंच पोएट्स’ अशी क्वेरी टाकली की गूगलचं सर्च इंजिनसुद्धा याचं नाव घ्यायला नकार देते इतका अविख्यात.
आतापर्यंत झॅक प्रीव्हेरच्या साध्यासुध्या, अर्थप्रवाही कवितांच्या अंमलाखालून मला कोणी बाहेर काढेल याची शक्यता दिसत नव्हती. पण काल क्लॉदची ही कविता वाचली आणि गर्र-गर्र झालं.

Ce sera le soir (रोज संध्याकाळ होताना..)
-क्लॉद इस्तेबान

स सेरा ल स्वार
ला मेम अर
द्यु स्वार
ले कॉलोंब
कॉमोसेरॉ आ स पोझे स्युर ले ब्रॉशेझ
संध्याकाळ होतेय,
रोजच्यासारखीच.
रोजच्याच वेळी
पक्षी येतायेत, झाडांवर बसतायेत,
रोजच्यासारखेच.
केल्क दिरा कॉम्म
लेर्ब ए ऑत
अलॉ नू अस्वार
रकॉंता नू पूर पासे ल तॉंप
यून इस्तवार अ प फ़ॉल्ल,
सेल द्यु रवा
की क्र्वाये तू सव्हार ए
क पेर्दी तू.
कोणीतरी म्हणतं,
"अरेच्चा! हे गवत बघ किती वाढलंय!"
"चल! इथेच बसूयात, आम्हाला नेहमीपेक्षा वेगळी अशी गोष्ट सांग पाहू!"
मी ही वेळ घालवायला
एका राजाची गोष्ट सांगते,
ज्याला सगळं माहीत होतें, सगळं येत होतं.
पण ज्याने सगळं गमावलं.
केल्क दिरा,
सँ ए फ़िनी
दे फ़ाब्ल त्रिस्त,
उब्लिऑ ले
क~म ल सोलेल
स कूश लॉंतमॉ
कोणीतरी म्हणतं,
बस्स झाल्या या बोधकथा,
दु:खाबरोबरच संपणारया.
चल सोड,
मावळतीच्या सूर्यासारखंच, आजचं
सग्गळं सग्गळं विसरून जाऊयात..

(मग दुसरया दिवशी
पुन्हा एकदा
रोजच्यासारखीच
संध्याकाळ होईल.
रोजच्याच वेळी
पक्षी येतील, झाडावर बसतील
रोजच्यासारखे.
.
.
.
)
--

कवितेला ’संध्याकाळच्या शेवटी’ असं नाव मुक्रर केलं होतं. पण नंतर ’शेवट’ हा शब्द एकदम गिळगिळीत वाटायला लागला.
शेवट- चिवट, त्रिवट.. छे! कुठल्याही स्वाभिमानी शब्दाशी याचं यमकसुद्धा जुळत नाही.
त्यामुळे या शब्दाला स्वत:च काही व्यक्तिमत्व नाही, जोरकसपणा नाही असं डोक्यात घेऊन शेवटी ’रोज संध्याकाळ होताना..’ हे नाव धारण करून कविता संपन्न जाहली.

13 comments:

Nandan said...

फोर्मिदाब्ल!

Anushree Vartak. अनुश्री वर्तक said...

masta !

BinaryBandya™ said...

chhanch

Raj said...

masta!

Eat & Burpp said...

C'était une merveilleuse expérience!!

Shraddha Bhowad said...

@नंदन,गीता (a.k.a Eat & Burpp)

Je suis tres heureux de savoir que vous connaissez cette langue. non seulement que vous pouvez me retourner un commentaire en francais. Tres bien, vraiment!

@अनुश्री, बी.बी,
माझ्या पोस्टला बहुधा नेहमीच सर्वात पहिल्या कमेंट्स देणारे मित्र. थॅंक यू!

@राज,
फ़क्त मस्त???
मला वाटलं तू आणखी कुठल्या कुठल्या भाषांमधल्या कवितांचे संदर्भ देऊन खूप मोठ्ठी कमेंट लिहीशील.
Hmph.अपेक्षाभंग की काय ते यालाच म्हणतात का?

Eat & Burpp said...
This comment has been removed by the author.
Eat & Burpp said...

Merci beaucoup Shraddha! J'ai terminé mon certificat en français retour à long. Aussi, je n'étais pas sûr si cela s'est bien passé! Surtout grammaticalement .. bon de savoir vous avez obtenu le contexte!

Abhijeet Ranadivé said...

किंचित दुरुस्त्या:
फ्रेंच कवितेत भविष्यकाळ वापरला आहे. म्हणजे संध्याकाळ होईल, पक्षी बसायला लागतील,... अशी शब्दरचना हवी.
'अरेच्च्या'सारखं मूळ कवितेत काही नाही. 'गवत उंच आहे म्हणून इथं बसू' इतकं साधं आहे.
'croyait tout savoir' म्हणजे त्याला असं वाटत होतं की त्याला सगळं माहीत आहे.

Shraddha Bhowad said...

@अभिजित
एकदम मान्य!
पण गोष्ट अशी आहे की हा ’अनुवाद’ आहे, ’भाषांतर’ नाही.
अनुवाद हा स्वैर आहे. त्यामुळे कवितेमधल्या व्याकरणाचा तेव्हढासा संबंध येत नाही अनलेस अर्थ बदलत नाही.
आणि त्यामुळेच मी ज्या भावांमध्ये ते वाक्य interpret केलं, त्या भावातच लिहीलं गेलंय. अरेच्चा वगैरे शब्द हे अशारितीनेच आलेले आहेत.
भाषांतर असतं तर ही चूक मी केली नसती हे ही तेव्हढंच खरं.
तुमचं निरीक्षण बरोबरच आहे, वादच नाही.

Saru said...

आवडली.

Ashish Mahabal said...

:-)

iravatee अरुंधती kulkarni said...

आवडली! :-)

 
Designed by Lena