पक्ष्याचे चित्र काढण्यासाठी..

मेघना, साधारण दोनेक वर्षापूर्वी ह्या खेळात घेत नाहीत म्हणून गळा काढला होता त्याची आठवण झाली.
:))))

------

आपल्या मातृभाषेशिवाय जी भाषा आपल्याला कळते, जवळची वाटते तिचा अनुवाद जास्त सोपा असतो. त्यामुळे डोक्याला अजिबात त्रास होऊ न देता मी निवडली फ़्रेंच आणि माझा लाडका फ़्रेंच कवी झॅक प्रीव्हेर. मराठी कवितेला मात्रा, छंद, वृतांच्या जोखडातून सोडवणारया केशवसुत, मर्ढेकर यांना जितके मानले जाते तितकाच मान फ़्रेंच साहित्यात झॅक प्रीव्हेरला आहे. त्याने यमक, व्याकरणाच्या सगळ्या प्रचलित संकेतांना धुडकवून लावत फ़्रेंच नवकाव्याचा पाया घातला.त्यामुळे फ़्रेंच कविता-विश्वात झॅक ला एक अनन्यसाधारण असे स्थान आहे.

सर्वसाधारणपणे कविता वाचायला सुरुवात करतानाच ’मला ही कळेल का?’ हा गंड आपल्या मनात असतो. पण झॅकची कविता जसजशी वाचत जाऊ तशी अधिकाधिक सोप्पी होत जाते. शब्दांच्या साध्यासुध्या मांडणीतली आशयघनता हा झॅक च्या कवितांचा फ़ॉटे.

बंडखोरी मला तशीही आवडतेच आणि साधेपणा त्याहून जास्त भावतो. त्यामुळे झॅक आवडायला वेळ लागलाच नाही. शब्दबंबाळ करण्यापेक्षा आशयाने कविता मनात रुतली तर ती जास्त काळ स्मरणात राहते हा बरयाच जणांचा अनुभव. माझाही अनुभव फ़ारसा वेगळा नाही. तस्मात झॅक प्रीव्हेर.

------

Pour Faire le portrait d'un oiseau (पक्ष्याचे चित्र काढण्यासाठी)
-झॅक प्रीव्हेर



पेद्र दाबोर यून काज.
अवेक युन पोर्त उवेर्त
पेद्र ओंस्वीत;
केल्क शो द जोली,
केल्क शो द सॉंप्ल,
केल्क शो द बो,
केल्क शो द्युतील,

पूर लुझो..


पहिले एक पिंजरा रंगव
ज्याला दारच नसेल.
मग रंगव त्यावर काहीतरी त्या पक्ष्यासाठी
जे देखणं असेल,
सरळ साधं भुरळ पाडणारं असेल,
दिमाखदार असेल
किंवा असेल त्या पक्ष्यासाठी आत्यंतिक गरजेचं.

प्लासे ओंस्वीत ला त्वाल कॉंत्र अ आर्ब्र.

दों अ जार्दा,
दों अ ब्वा,
आ दों यून फ़ॉरेत,
स काशे देरीयेर लार्ब्र.
सॉं रेया दीर,
सॉं बुजे.

मग तो कॅन्वास एखाद्या झाडाला टेकून ठेव.
कुठल्याही अशा ठिकाणी,
जिथे पक्षी येणारच याची खात्री असेल.
एखाद्या बागेत,
एखाद्या राईत,
किंवा एखाद्या जंगलात.
तिथल्याच एखाद्या झाडापाठी लपून बस.
निशब्द..
निस्तब्ध..
बघत रहा काय होते ते.

पाफ़्वा लुझो अरिव्हे व्हिते,

मे इल प ऑसी मेत्र द लॉग आने,
अव्हॉंत द स देसिदे.
न पा स दिकूरिजे.
अतॉंद्र..
अतॉम्द्र सिल ल फ़ो पॉदॉ देझाने..
ल वितेस ओ ला लॅंतर द लॉरिव्हे द लूझो
न्यॅंत ओका रापो
अवेक ला रेयुझिते द्यु ताब्लो,
क्वांद लूझो आरिव्हे.

कधीकधी पक्षी लवकर चालून येतो त्या पिंजरयात..
तर कधी त्या पिंजरयात शिरावं का नाही याचाच विचार वर्षानुवर्षे करत राहतो.
पण..
निराश होऊ नकोस.
वाट पाहा.
वाट पाहत राहा कित्येक वर्षं, जर लागलीच तर.
त्या पिंजरयातलं पक्ष्याचं आगमन किती लवकर किंवा किती उशीरा,
याचा चित्र किती यशस्वी याचा तसा काहीही संबंध नसतो.
(कारण लवकर किंवा उशीरा..
पक्षी तिथे येणारच असतो.)

सिल आरेव्हे,

ऑब्सर्व्हे ल प्लू प्रोफ़ॉं सिलॅंस.
अतॉम्द्र क लुझो ऑंत्र दो ला काज,
ए क्वांद इल ए ऑंत्र.
फ़ेर्मे दुझमॉं ला पोर्त अवेक ल पेसो.
प्युई,
इफ़ासे अ आ अ तू ले बारो.
ऍं अयान्त स्वे द न तूशे आकून द प्लूम द लूझो.

तो येईपर्यंत चूपचाप बसून रहा.
आणि एकदा का तो पिंजरयात शिरला की,
त्या पिंजरयाला एक दार रंगवून टाक.
एकामागून एक जाडजूड गज पण रंगवून टाकायला विसरून नकोस.
आणि हो..
पण हे सर्व करताना पक्ष्याच्या पिसालाही धक्का लागणार नाही याची काळजी घे.
(तो पक्षी ज्या कशात मग्न आहे
त्याला मग्न राहू दे तसाच.)


फ़ेयर ओंस्वीत ल पोर्त द लार्ब्र,
ओं श्वाझीझॉं ल प्लू बेल द स ब्रॅशे,
पूर लूझो..
पेद्र ऑसी ल वेर्त फ़्युलाज ए ला फ़्रेशर द्यु वेंत,
ला पूझियेर द्यु सोलेल,
ए ल ब्रुई दे बेत द लेर्ब दों ला शालर द लेते.
ए प्युई अतॉंद्र क लूझो स देसिदे आ शॉंत.

त्या मग्न पक्ष्यासाठी मग सुंदर डहाळ्यांचं झाडही रंगव.
मग रंगव पानगळ, स्वच्छ भिरभिरता वारा आणि पानांमधून येणारे कवडसे,
आणि लख्ख उन्हातली किडयांची किरकिर, भुंग्यांचा गुंजारव.
(काय बेटा भाग्यवान आहे.)
आता..
तो पक्षी कधी गातोय ह्याची वाट बघ.
(गायलाच पाहिजे तो )

सि लूझो न शॉंत पा,

से मूव्हे सिन्य.
सिन्य क ल ताब्लो ए मुव्हे.
मे सिल शॉंत चे बों सिन्य,
सिन्य क वू पूव्हे सिन्ये.
अलॉ वू अराशे तू दुसमों
यून दे प्लूम द लूझो,
ए वू एक्रिव्हे वोत्र नॉम दों अ क्वे द्यु ताब्लो.

गायलाच नाही तो तर..
अरेरे...काय दुर्दैव!
चित्र खराब आहे. आता काय करणार?
पण जर तो गायलाच ..
तर वाहवा.
तुमचं चित्र किती सुंदर यावर शिक्कामोर्तब झालंय.
आता हळूच काढून घ्या त्या पक्ष्याचं एक पीस.
आणि त्या पिसानेच त्या सुंदर चित्रावर तुमची लफ़्फ़ेदार सही ठोकून द्या.

------

माझा खो कोहम आणि जास्वंदी ला.

19 comments:

Raj said...

C'est très bien, J'aime le poème.

Shraddha Bhowad said...

Merci beau coup Raj. Vous parlez francais? Je suis huereux de savoir.

Abhijit Bathe said...

जियो!

Nandan said...

choix idéal du poème et une excellente traduction! :)

Gayatri said...

आहा! खूप खूप धन्यवाद!

Meghana Bhuskute said...

अरे अरे - फ्रेंच न येणार्या मर्त्य मानवांसाठी थोडी मराठीपण वापरा की.

कविता खतरनाक-भेदक आहे. कंसातला मजकूर विशेष करून. तो मूळ कवितेत कंसात आहे की कसं?

आणि श्रद्धा, तू खो द्यायला विसरलियेस?

Raj said...

@Shraddha Je ne parle pas très bien, je suis encore à apprendre :)

@Meghana : Translation : I do not speak French very well, I am still learning. :)

Smiley English ani French donhIkaDe :) asach asato :p

Shraddha Bhowad said...

@मेघना,

मी ’खो’ दिलेत आता. :))))

आपण संस्कृत भाषांतर करताना कसं वाक्यात नसलेला पण अभिप्रेत असलेला अर्थ कंसात लिहायचो. तसंच.

झॅक ची कविता मला ही या प्रकारे समजलीये. आणि ती मला त्या कंसामधल्या मजकूराशिवाय नीट पोहोचवता आली नसती. आणि जे शब्द कवितेत नाहीयेत ते अभिप्रेत असले तरी ते झॅकच्या नावावर टेपायचा आगाऊपणा मी कसा करणार?? म्हणून..

@गायत्री
खूप खूप आभारी आहे.

@नंदन, राज
मला खरंच खूप छान वाटतंय तुमचे फ़्रेंच मधले रिप्लाय बघून. तुम्ही झॅकच्या 'Alicante', 'Cet Amour', 'Pour Vous Mon Amour'वाचल्यात का? नसतील वाचल्या तर जरूर वाचा. ’आमेली’ ह्या फ़िल्मची प्रेरणा मुळातच ’Alicante' वरून घेतली गेलीये.

@अभिजित
खूप दिवसांनी इन फ़ॅक्ट खूप महिन्यांनी तुझी कमेंट आलीये. Thanks!

Jaswandi said...

अगे... ही कविता भारीच आहे..

आणि ह्या "खो"चं जाम टेन्शन आहे राव.. कारण तसा कविता आणि माझा लई दुरपर्यंत काही संबंध नाही.. प्रयत्न करेन.. Thank you खो साठी

:)

Saee said...

Khupach sundar. :')
Jiyo!!

Mandar Gadre said...

मावसबोलीतल्या कवितांच्या खो-खो मध्ये सईकडून खो मिळाला आणि मागे मागे जात इथे आलो.

फार सुरेख आहे ही कविता! मला फ्रेंच येत नाही त्यामुळे कविता मराठी असावी अशीच वाचली.

आणि तुझ्या आधीच्या काही posts सुद्धा खूप आवडल्या :) आता येत राहीन इथे :)

Samved said...

श्रद्धा- अफाट सुंदर कविता आहे. I was stunned at it's simplicity आणि भेदक तर किती! माझं फ्रेन्च कनेक्शन (मला तो देश- संस्कृती फार आवडते इतक्या मर्यादित अर्थानं) फार जुनं आहे त्यामुळे आज न उद्या ती भाषा मी शिकेन अन परत एकदा तुला कॉमेन्ट देईन. फार छान कविता निवडलीस आणि उत्तम दर्जाचा अनुवाद केलास!

Shraddha Bhowad said...

@सई, मंदार
खूप खूप आभार

@जास्वंदी
There's always a First Time. प्रयत्न करशील याची खात्री आहे.

@संवेद
तु जेव्हा फ़्रेंच शिकशील तेव्हा तुला ही कविता गुणगुणायला पण छान वाटेल. एकतर फ़्रेंच मध्ये आपल्या ड, ट सारखी कठोर व्यंजनं नाहीत हे तुझ्या लक्षात आलंच असेल. साधं बोललं तरी लकेर घेतल्यासारखं वाटतं. तू खरंच शिक ही भाषा.

Megha said...

Aha!! kay sundar kavita aahe....mi fakta marathitali vachali...french kay zepla nahi....pan kavitechi nivad sahi!!

sumita said...

sundar!

yogik said...

bhayan sundar!! why not more??

कोहम said...

tu mala kho dila hotas he nukatach don minutes purvi lakshat ala. sorry kho gheu shakalo nahi. blogach baryach divasanni ughadalay

Revati said...

Hello Shraddha,

Utkrusht anuvad!
Me hi kavita French madhun shikle ahe ani mazya students na pan pratyakshik karun shikavli ahe...!
Atishay javalcha ahe Jacques Prevert chya kavita!

All the best!

Revati

Shraddha Bhowad said...

हाय रेवती,
थॅंक्स मेट!
झॅक माहित असलेली व्यक्ती अशी आऊट ऑफ़ नोव्हेयर भेटणं सुद्धा अचाट असतं. ग्लॅड टू सी यू!
बाय द वे, तुझ्या प्रो.पिक मधला 'rue de la Paris' बिफ़ोर सनसेट मध्ये होता नाही का? लव्हली मूव्ही. तो आणि आमेली.

 
Designed by Lena