बडी देर भई..!

परवा आनंदी आणि सुब्रतोचा ब्रेक-अप झाला...ऑफ़ीशियली!!
२ वर्षापासूनचं लळत-लोंबत पडलेलं प्रकरण संपलं एकदाचं..आणि मला जी पाचर ठोकली गेली होती ती ही निघाली एकदाची!!
बेसिकली तिच्याहून परस्पर भिन्न अशा सुब्रतोमध्ये तिला काय आवडले कुणास ठाऊक???
म्हणजे त्याचे वाडगाभर भात आणि बरोबर माछेर जॉल फ़न्ना करणारे तोंड पाहून कोणाला काही रोमॅंटीक वाटण्याची सुतराम शक्यता नाही असे मला ठामपणे वाटायचे...पण या बयेला ते क्युट वाटले..
पाच पाच वाट्या दह्या खात ’मोई मिष्टी दोही’ आळवताना त्याचे डोळे लुकलुकायचे ते आवडायचे म्हणे तिला...मी म्हटले घंटा...!
आणखी काय बोलणार???
वेडाचार चालला होता दोन वर्षे..
सुब्रतो, मी, आनंदी आणि विशू ही आमची चौकडी बंगाली वर्गांमधली...
सुब्रतो आम्हाला बंगाली शिकवायला होता.
तसा तो साधारणच होता..टिपीकल बंगाली!!!
वंग पृथांनी...आयांनी..मावशांनी अतिशय लाडावून ठेवलेला पुरुष...ढेरी बाहेर आलेला..
पण त्याच्या एकंदर व्यक्तिमत्वाशी अतिशय विसंगत होते त्याचे डोळे..
काळेभोर...निर्व्याज तरीही कशाचा ठाव न लागू देणारे...बरंच काही होतं त्या डोळ्यांमध्ये..
गुरुदेवांच्या कविता त्याला मुखोद्गत होत्या...त्या बोलून दाखवताना त्याचे डोळे असे काही लक्खन तेजाळून उठायचे..
आनंदीला तो आनोंदी म्हणायचा...
विशू जाम वैतागायचा..म्हणायचा..."फ़ोफ़्शा...आणखी एकदा म्हणत तिला आनोंदी...नाही चार-पाच बुक्क्यांची नोंद तुझ्या दोंदीवर केली तर बघ.."
त्यावेळी हसून गुळी व्हायची..तो ही विशूच्या शालजोडीवर काही न कळून पोट गदगदवून हसायचा.
आमच्यात पहिला ताण आला ते आनंदीने ती सुब्रतोच्या प्रेमात पडलीये हे आमच्याकडे जाहीर केलं तेव्हापासून..आम्ही मुळासकट हादरलो...
कुठे आनंदी आणि कुठे सुब्रतो...दोन टोकाची माणसं..
आनंदीसारखी प्रगल्भ आणि स्मार्ट मुलगी गीतांजली पाठ असणं आणि काळेभोर डोळे एवढी पुंजी असलेल्या माणसाच्या प्रेमात पडू शकते हा एक नवीनच साक्षात्कार आम्हाला झाला..
ऑफ़ ऑल द पीपल इन द वर्ल्ड...सुब्रतो???
काय म्हणणार??
आता नातं कधीतरी तुटणारच आहे म्हणून जीव लावायचाच नाही ही लॉजिक कुठल्या हजामाचं आहे??
कुठल्याच हजामाचं नाही...कारण ते सुब्रतोचं मत होतं....
त्याचा म्हणे अशा नात्यांवर विश्वास नव्ह्ता..कुठलंही नातं काहीतरी मोटीव्हनेच जोडलेलं असतं असा त्याचा ठाम विश्वास होता..आणि या कार्टीला तेच ’तीव्र असे काही जीवघेणे’ वाटलं...
ती आपली त्याच्यात वेडीवाकडी गुंतत गेली..
मी बदलायला लावेन त्याला...असं आम्हाला ठणकाऊन सांगत!
वर्षानुवर्षे मनाशी धरून ठेवलेले समज असे थोडीच ना दूर करता येतात वेडे??
म्हटलं ठिक आहे..
सुब्रतो आणि आनंदीचं काही जमण्यासारखं नाही हे आम्हाला आमच्या पहिल्या मीट मध्येच कळले..
’कोबे सिझलर्स’ मध्ये सुब्रतोने पूर्ण टेबलवर सांडवलेलं उष्टं...तोंडाने येणारा मच्याक मच्याक आवाज..तोंडातला पुरता घास न संपवता तोंडातली शितं उडवत बोलणारा सुब्रतो जाम गिळगिळीत वाटला होता...टिप-टॉप महाराणीसारख्या राहणारया आनंदीपुढे तर फ़ारच...
पण सुब्रतो मुळे ओशाळून येवढुश्शी झालेली आनंदी आम्हाला बिलकुल ओळखीची नव्हती...
हे तिनं कसंतरी पचवून घेतलं असावं..
तिला त्याच्यात नेमकं काय आवडलं हेच तिला डिफ़ाईन करता येत नसावं असं बरयाच वेळा वाटायचं..
तिला एका इंपल्समध्ये काहीतरी आवडून गेलं असावं कदाचित...पण ते ’काहीतरी’ नंतर तिला कधीच सापडलं नाही..
तिने ते शोधायचा खूप प्रयत्न केला...नंतर सरधोपट मार्ग स्वीकारला..
रोमॅंटीक बोलणं तर सोडाच त्याला साधं आनंदी खुलेल असंही बोलता यायचं नाही..
आता असतात अशी माणसं...त्यात काही गैर नाही..पण नेमका तसाच मनुष्य अतिशय रसिक, रोमॅंटीक अशा आनंदीला मिळावा???अह...तो तिने पसंत करावा???
त्याला कधी फ़रक पडायचाच नव्हता पण तिचं चुरमडत जाणं आम्ही दिवसांगणिक पाहत होतो...तिचा आऊट झालेला चेहरा बघून कधी कधी माझं तोंड शिवशिवायचं..पोटात तुटायचं..पण विशूने नेहमी अडवून धरलं..."शी शूड लर्न हर ओन लेसन.."
"मी असाच आहे तुला माहीत होतं..""
"मी नव्हतं सांगीतलं माझ्यावर प्रेम कर म्हणून..आय वॉर्नड यू बीफ़ोर"
"मला एकटं रहायची सवय झालीये आनंदी...माझी मनाची तयारी तीच आहे...व्हाय डू यू वेस्ट युअर टाईम ऍंड माईन टू?"
अशा प्रकारची वाक्यं त्याच्या बोलण्यात वारंवार यायला लागली.
तिला त्याच्यात जे काही आवडले त्यासाठी तिने मनापासून सर्वकाही केले..शेवटी ती एक मनस्वी मुलगी होती...
पण परतून त्याच्याकडून काहीच आले नाही तेव्हा मात्र ती शहाणी झाली..
दोन वर्षाच्या दु:स्वप्नातून एकदाची पडली बाहेर...तिच्याबरोबर मी पण!
आनंदीसारख्या बरयाच मुली असतात ज्या इंपल्सवर जगतात..त्या इंपल्सशी इमान राखत आयुष्यभर झगडत राहतात...त्यांची अर्धी शक्ती जाते झगडण्यात आणि अर्धी स्वत:ला वेडं होण्यापासून वाचवण्यात...
आनंदीसारख्या फ़ार कमी नशिबवान मुली असतात ज्यांना ह्या प्रकारात राम नाही हे तुलनेत फ़ार लवकर कळतं..
मलाही कधीकधी असं वाटतं की हे इंपल्सवर जगणं बिगणं हा शुद्ध येड**पणा आहे...
"मला इंपल्सवर जगणारी माणसं आवडतात" माय बट्ट...!
असं बोलणारा मनुष्य केवळ व.पुं.च्या कथेत भेटतो...आणि हे किती पुस्तकी आहे हे प्रकर्षाने तेव्हाच जाणवतं..
कारण जेव्हा आपल्यासमोर आनंदीसारखं, स्वत:सारखं जितंजागतं उदाहरण असतं तेव्हा ह्या गोष्टी हवा वाटतात..
"मला वाटलं ते मी केलं...मला त्याचे रिग्रेट्स नाहीत...उद्या मी मनाविरुद्ध जगले असं नको वाटायला" हा डायलॉग ’जब वी मेट’ मध्ये कसला भारी वाटतो ना?
रील लाईफ़ सोडून रियल मध्ये आलं की oh please...give me a break!
स्वत:ला सतत तपासत राहिलं पाहिजे...निर्णय जोखून पाहिले पाहिजेत..
क्षणिक उर्मीत मोठे निर्णय घ्यावेसे वाटले..किती अवास्तव आहेत याचा विचार केला पाहिजे..
नाहीतर..
देर भई..बडी देर भई..!

6 comments:

सर्किट said...

hmm.. true..

fakt ata tine swat: cha dev-D nako karun ghyayla. nahitar nustach tyachyapasun duur hoNa hoil, suTakaa naahi.

साधक said...

काय नशिब असतं एकेकाचं.सुब्रतोचं वर्णन ऐकुन वाटतं की अशा माणसाला पण गर्लफ्रेन्ड असु शकते??त्यामुळे आमच्या जगण्यात आता खरंच काही राम राहिला नाहिसे वाटते. ~ आभार

ajay said...

आनंदीला आनंद मिळू दे!,म्हणून ही कमेंट.तसेच तुझ्या या मनापासून लिहिलेल्या पोस्टसाठीही ही कमेंट.
जुने पोस्टही वाचले. छान!
डायरेक्ट मनातलं लिहितेस, काही राखून न ठेवता. अगदी inside out.

Samved said...

जब्बर भारी. प्रेमात पडणं फार सोपं असतं. पण उपरतीच्या क्षणी हे प्रेम नव्हे हे समजणं, स्वतःशी ते कबूल करणं अन समोरच्याला ते शक्य तितक्या लॉजिकली सांगणं हे भयंकर अवघड आणि अत्यावश्यक. नाही तर आयुष्य भराची नाती ओझी होऊन जातात

Unknown said...

ghat par kartana nehami 1 pati diste. DURGHTANASE DER BHALI....
anandi ne jara ghai kelich... pan 2 varshane ka hoina tila tichi chuk umgali.. subrato sarkhya vyakti ya 1tynae jagtata aani 1tyanech martat. anandine je kai kele te yogyach... tine aata navyane survat karavi. Baki post chhan...... tu pan yatun barech kahi shikli aashil.....

Dk said...

hmmmm
e srkit>
tine swat: cha dev-D nako karun ghyayla Dev D naahe DEVI D as mhn :D :D

अशा माणसाला पण गर्लफ्रेन्ड असु शकते??> hmmm he matr khraay 100% :P

[well i know ha blog tuzaa aahe pan raahaavle naahee mhnun hya vrchya comments.

jokes apart

जेंव्हा कुणी प्रेमात पडतं म्हणजे नक्की कुठे पडतं हे तपासून बघत नाही आणि मग सगळा हा असा लोचा होतो! फारच इन्टेन्स होते मग ती व्यक्ती.

बाकी मी हे ऐकलय आणि अनुभवलही आहे की ९९% मुलांना हवी(म्हणजे जिच्यावर प्रेम आहे ती ;) ) ती मुलगी मिळत नाही म्हणजे १ % मुलच लक्की असतात आणि९९% मुलींना हवा तो मुलगा मिळतो :) [आणि मी९९% क्यात मोडतो :( ]

बाईसाहेब आपण ग्रेट लिहिता हे काय मी सांगायची गरज नाही तरीही सांगतो.

 
Designed by Lena