तिरक्या...एली..आणि कालचा पाऊस..!!

तीर्थकर भयंकर अस्वस्थ होता..
दोन दिवस एलीचा पत्ता नव्हता...फ़ोन out of range लागत होता...
आज सकाळपासून एअरटेल ऑपरेटरची तीच तीच बकवास ऐकून तो अगदी कंटाळून गेला होता...
आहे कुठे ही पोरगी???मला सांगून जात नाही असं तर कधीच होत नाही..
सकाळपासून आभाळ नुसतं भरून आलं होतं...सोसाट्याचा वारा सुटला होता...
पहिलाच पाऊस मुसळधार पडणार अशीच चिन्ह होती...
ह्या पोरीला नक्कीच या सोसाट्याच्या वारयात adventures करायची हुक्की आली असणार...
मागच्या वेळी सोसाट्याच्या वादळात ’डयुक्स नोज’ पाहायला गेली होती कार्टी..
पुन्हा एकदा फ़ोन लावायला रिसीव्हर उचलणार इतक्यात फ़ोन वाजायला लागला..
तीर्थकर भूत पाहावं तसं फ़ोनकडे बघत राहिला..
फ़ोनवरून विचारणा झाली..
"तिरक्या...??"
तीर्थकरला अशा अतरंगी नावाने हाकारणारी फ़क्त एकच व्यक्ती आहे....
एली...
एरवी तीर्थकरला आपल्या नावाचा ऊरभर ठासून अभिमान आहे..पण एलीसमोर कोणाची बोलायची टाप आहे???
जगासाठी तो तीर्थकर पण एलीसाठी तो तिरक्या..!
"तिरक्या...मी खाली रिसेप्शनला उभी आहे...लवकर निघ.."
"अग पण एली..."
"कोणालाही मार...आजारी पाड...मला सांगू नकोस...i want you downstairs in 5 minutes from now.."
एली भन्नाट आहे...तिच्या नावासारखीच...
तिचं नाव एलिझाबेथ...चारचौघींसारखी अल्पना, पर्णिका किंवा कुठलीतरी कपर्दिका अशी नावं न ठेवता तिच्या वडीलांनी तिचं नाव एलिझाबेथ ठेवलेलं..
आणि वडीलांनी ठेवलेलं म्हणून तिला अंमळ जास्तच प्रिय..
तीर्थकरला एलीची नेहमीच चिंता वाटे...म्हणजे तिच्या मुलगी असण्याची नव्हे..तर तिच्या टोकाच्या मनस्वीपणाची..मनाला त्या त्या क्षणी जे वाटेल ते बेधडक करण्याची..
थोडीशी बेपर्वा, थोडीशी उध्दट असली तरी मनाने स्वच्छ होती, अरागस होती...
आणि म्हणूनच तीर्थकरचा तिच्यावर जीव होता..
एली आणि तीर्थकर आज पाच वर्षे मित्र होते....एली मित्रापेक्षाही बरेच काही होती तीर्थकरसाठी..
फ़क्त तीर्थकरसाठी....
एलीला काही सांगायची सोयच नव्हती...
"तिरक्या..जाम सेंटी मारतोय आज? ड्रॉप इट नाऊ..."असं म्हणून उडवून लावलं तर???
आपण तिच्यासमोर झुरळ आहोत हे ती सिद्ध करून दाखवेलही...
म्हणून आजवर तिरक्या गप्प होता...
मनात एका फ़ोनसरशी येऊन गेलेल्या विचारांना हाकून लावत, बॉससमोर खुद्द त्यालाही पटणार नाहीत अशी चलनं फ़ाडून तीर्थकर खाली आला...
एलीसाठी काहीही...
"पेट्रोल ची टाकी फ़ुल्ल कर...आपण बाहेर चाललो आहोत...."
"एली...तुझा पत्ता काय??तू होतीस कुठे...?"
"तिरक्या...कळेलच ना सगळं??थोडा वेळ कळ नाही काढू शकत???
तीर्थकर गप्प...
"ठिकाय...चल"
तीर्थकर एली सांगेल तशी गाडी चालवत राहिला...जवळजवळ एक दीड तासाच्या प्रवासानंतर एक आडवाटेचे गाव लागले...
पुढे सरळसोट छोटी पाऊलवाट होती...पण मध्येच त्या पाऊलवाटेने लाजून मुरका मारावा अस तिला एक फ़ाटा फ़ुटला होता...आणि..
त्या फ़ाट्याच्या बरोबर शेवटी एक बंगलीवजा घर होते...एलीने तीर्थकरला गाडी तिकडे घ्यायला सांगीतली...
बंगली तशी टुमदार...पण बंगलीच्या बाजूला दिमाखात उभं असलेलं एक झाड तीर्थकरच्या नजरेत भरलं..
एली बंगल्याचं फ़ाटक उघडून आत शिरली...तीर्थकरने नेमप्लेट पाहिली...
ते एलीच्या वडीलांचं घर होतं...
एलीनं त्याच डौलदार झाडाच्या खाली बसून घेतलं एलीनं त्याच डौलदार झाडाच्या खाली बसून घेतलं होतं...
तीर्थकर काय करावं हे न कळून तसाच उभा राहिला....पण तेवढ्यात सुरू झालेल्या पावसाने त्यालाही त्या झाडाखाली हलवलं...
एलीला पाऊस भयंकर प्रिय...
पावसात तुम्हाला छत्र्या लागतात कशाला रे???असा प्रश्न ती हटकून तिरक्याला विचारी...
पण एलीच्या जगात सर्व काही शक्य असल्याने आर्ग्युमेंटला मुळीच जागा नसायची..
एरवी पहिल्या पावसात वारा प्यायलेल्या वासरासारखी उंडारणारी एली त्या पावसाकडे बघत फ़क्त बसून होती...
एलीच्या मनात काय आहे?
पाऊस संपेपर्यंत एली-तिरक्या झाडाखाली बसून होते..
एली पावसाकडे बघत होती...तर तिरक्या एलीकडे...
नेहमी बेसुमार बडबड करणारया एलीचे स्वस्थचित्त आणि जाणते रूप तिरक्या प्रथमच पाहत होता..
"एली..???"
एलीने तिरक्याला झाडाखाली उभे केले आणि कशाचीतरी वाट पाहत डोळे मिटून फ़क्त उभी राहिली..
एवढ्यात वारयाची एक लहर आली...आणि...
डोक्यावरचं झाड पानाफ़ुलावरचं पाणी ओळंबत त्यांच्यावर बरसलं..
आणि ऑफ़िसमधून निघाल्यापासून आत्तापर्यंत गप्प गप्प असलेली एली बोलू लागली..
"माझ्या लहानपणी मी आणि डॅड इथेच या झाडाखाली बसत असू..माझ्या आणि डॅडच्या बरयाचश्या आठवणी या झाडाशी निगडीत आहेत..हे...’पावसाचे झाड’ आहे.."
पावसाचे झाड????
तिरक्या विस्मयचकीत होऊन ऐकत होता..
"पहिला पाऊस आम्ही याच झाडाच्या अंगाखांद्यावरून अंगावर घेत असू..after dad passed away मी कध्धी कध्धी या झाडाकडे फ़िरकले नाही...पण...तुझ्याबरोबर असताना i felt i dont miss my dad anymore...सो, एकवार पुन्हा तुझ्याबरोबर या इथे यावेसे वाटले...दोन दिवस मी इथेच होते...जगापासून दूर, तुझ्यापासून दूर....i never felt so vacant.."
एली भरून आलेल्या आवाजात पुटपुटत राहिली..
नेहमीच मनाचा कौल मानत आलेल्या एलीच्या भावनांच्या सच्चेपणाबाबत तिरक्याला काही संदेहच नव्हता...
असं असेल तर मग....
"एली....अम.....मला काही विचारायचे होते.."
"हुं.."
"अं...तुला मी...म्हणजे तू माझ्याशी..."
तिरक्या शब्दाशब्दाला ठेचकाळत होता..
आतापर्यंत मुसमुसत असलेली एली आपल्या रडवेल्या नाकाच्या नाकपुडया आणखी फ़ेंदारत फ़िस्कारली...
"dont spoil the moment you MCP...."
तिरक्या अवाक..
"yes...i do want to marry you...what took you so long???"
मग सगळं काही उमजून आल्यासारखा तिरक्या हसायला लागला....अगदी पावसाच्या झाडासारखा..
दोन बोटे बंदुकीसारखी रोखून एलीला म्हणाला.."गुन्हा कबूल???"
डोळ्यातलं पाणी निपटत एव्हाना एलीने तिचं टिपीकल खट्याळ हसायला सुरुवात केलेली असते...
"कबूल कबूल.."
मग प्रत्यक्ष हसण्यालाही हसू फ़ुटावं असं आसमंतात भरून राहिलं...
त्या दोघांना खळाळ हसताना पाहून पावसाचं झाडही पुन्हा एकवार अंगभर गदगदलं...त्या दोघांना झिम्माड भिजवून आपल्या मस्तीत डोलायला लागलं...
कालच्या पावसाने तिरक्याला एली दिली...
एलीला तिचं पावसाचं झाड दिलं...
पावसाच्या झाडाला नवा दोस्त दिला...
सर्वांना सर्व काही दिलं....
कालच्या पावसाने तुम्हाला काय दिलं??

8 comments:

कोहम said...

hmm. masta....kalachya pavasane amhala athavaNi dilya...

Shirish Jambhorkar said...

आई शप्पथ काय सही Character आहेत तिरक्या आणि एली ... लैई भारी ग ............

मी गुंग झालो होतो वाचताना ...

Shirish Jambhorkar said...

तू लिहिलेले वाचताना ... मी भान हरवून गेलो...
आणि वाटले आता लिहायची गरज संपली...
तसे बरेच दिवस झाले मी वाचणे सोडून दिले होते ... कादांबरी वगैरे तर वाचनेही विसरलो होतो ...
मी आधी खूप अधाश्या सारखा वाचायचो .. पण काय माहीत कुठे गेले होते आयुष्य ... परत त्याची आठवण जागी झाली .. आणि मला वाचावेसे वाटेल असे तुझ्या ब्लोगच्या रूपात काही तरी देऊन गेली ... -- शिरीष

Shraddha Bhowad said...

एवढ्या भरभरून दिलेल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद..!
माझ्या लिखाणामुळे तुम्हाला पुन्हा एकदा वाचणे चालू कराल हे ही नसे थोडके!
पण एकच सांगेन..
वाईटातलं वाईट लिखाणसुद्धा ’वाईट’ म्हणून चांगलं असतं...
वाचणारयाने वाचत राहावं..आवडलं तर कळवत राहावं..
श्रद्धा...’शब्द-पट’वाली...

Meghana Bhuskute said...

मला वाटलं, 'उत्खनन'वर तुझा टेक असेल, तर ही वेगळीच गोष्ट निघालेली. काय करत होते मी तू लिहीत असताना? सहीये...

Dk said...

kalachya pavasane amhala chaan gosht dilye!

reel life madhli real life madhye naslelee! pan chaan aahe aaavdliy :)

-junkMind said...

मस्त लिहलय.. आवडल आपल्याला..
मला पण सापडेल एक एली.. जी मला विचारेल "गुन्हा कबूल???", hopefully...

Unknown said...

kharach khupach chan. tu vachnarya la shadbanshi nantar tyatalya patranshi ani nanatar tyatalya bhavnanshi jodun thevtes ... vachat asatana pratyek veli pudhe kay hoeil yachi utuskta hoti.
hi lekhani fakt prem ya vishaya var n thevata dusarikade suddha tu vadhav hi apekhsa.

Thank you

best regards
Vikas Khengare
[vikas_khengare@yahoo.com]

 
Designed by Lena