मै लाख जतन कर हारी..!!!

काल माझ्या PC मधलं माझं Folder ’लावत’ बसले होते..
म्हणजे काय आहे...महीनाभरात जो काही data मिळवून dump केला त्याला सुसंगतरित्या लावायचं काम मी शुक्रवारी करते...week-endला..
Load-sheddingमुळे गेलेली वीज ८-३० पर्यन्त परत येते...९.१५पर्यन्त कुठलातरी पिक्चर बघत किंवा एखादं पुस्तक चाळत जेवण आणि नंतर या आवराआवरीस सुरुवात...
या dataमध्ये बहुतेककरून खूप सारी इ-बुक्स, कुठल्या ना कुठल्या pdf फ़ाइल्स , किंवा download केलेली गाणी असतात..
माझ्या बहिणाबाईपण या dumpingमध्ये आपली मौलिक भर टाकत असतात..
अशी ही माझी उपसाउपशी म्हणजे बरयाचवेळा ’डोंगर पोखरून उंदीर’ असते..म्हणजे सगळं संगतवार लावल्याचं समाधान याखेरीज काही हाती लागत नाही..
यावेळी मात्र असं व्हायचं नव्हतं..
यावेळे माझ्या हाती लागलं 'Fuzon' आणि त्यातलं नितांतसुंदर ’मोरा सैय्या’...

जिचा पती परदेशी निघून गेला आहे आणि शंकाग्रस्त झाल्याने जिचं मन मुळी कश्शाकश्शात लागत नाहीये अशा ’प्रोषितपतिका’ नायिकेचं वर्णन करणारी ही बंदीश कम ठुमरी...’खमाज’ रागात गायलेली...
’खमाज’...दिवसाच्या ’पाचव्या’ म्हणजेच रात्रीच्या ’पहिल्या’ प्रहरात गायला जाणारा राग!
तिन्हीसांज, संधिकाल, आणि थोडीबहुत रात्र या समयाला कवेत घेणारा रात्रीचा पहिला प्रहर..
ज्या प्रहरात मन उगाचच काळवंडून जाते...भयशंकीत होते....आठवणींचा चकवा पुन्हा पुन्हा फ़ेर धरत नाचायला लागतो...कुणाच्यातरी आठवणीत शरीरातला अणू-रेणू बंड करून उठतो...अशा कातरवेळी गायला जाणारा हा राग...
अशा रागात आणि ’तीनताल’ उर्फ़ ’त्रिताला’त बसवलेली ही बंदीश!!!

सावन बीतो जाये पे हरवा
मन मेरा घबराये
(सर्वांना तजेलदार करणारा श्रावण आता सरत आला....
पण माझं मन मात्र शंकीत आहे..)

ऐसो गये परदेस पिया तुम
चैन हमें नहीं आये
(तू असा परदेशी निघून गेलेला..
जिवाला स्वस्थता अशी नाहीच...)

मोरा सैय्या मोह से बोले ना
मोरा सैय्या मोह से बोले ना
(कारण...
माझा प्रियतम माझ्याशी बोलायला नाहीये इथे...)

मै लाख जतन कर हारी
लाख जतन कर हारी
(काय काय नाही केलं पण सारं व्यर्थ...
सगळं काही करून हरले पण तुझी आठवण काही सरत नाही...)

मोरा सैय्या मोह से बोले ना
मोरा सैय्या मोह से बोले ना
(कारण...
माझा प्रियतम माझ्याशी बोलायला नाहीये इथे...)

तुम जो नहीं तो ऐसे पिया हम
जैसे सुना आंगना..
(तू नाहीस तर मी अशी
जशी भरल्या घरात एखादं भकास अंगण!!!)

नैन तेहारी राह निहारे
नैन तेहारी राह निहारे
नैनन को तरसाओ ना..
(तुझ्याच वाटेकडे डोळे लावून बसले रे...
त्यांना आणखी व्याकूळ नको करूस... )

मै लाख जतन कर हारी
लाख जतन कर हारी
(काय काय नाही केलं पण सारं व्यर्थ...
सगळं काही करून हरले पण तुझी आठवण काही सरत नाही...)

प्यार तुम्हे कितना करते है
तुम ये समज नहीं पाओगे
(तुझ्यावर किती प्रेम आहे माझे
जे तुला काही केल्या कळायचे नाही..)

जब हम ना होंगे तो पे हरवा
बोलो क्या तब आओगे??
(अरे प्रिया सांग की...
मी नसेन इथे
तेव्हा का येणार आहेस??)

मै लाख जतन कर हारी
लाख जतन कर हारी
(काय काय नाही केलं पण सारं व्यर्थ...
सगळं काही करून हरले पण तुझी आठवण काही सरत नाही...)

मोरा सैय्या मोह से बोले ना
मोरा सैय्या मोह से बोले ना
(कारण...
माझा प्रियतम माझ्याशी बोलायला नाहीये इथे...)

पहिल्याच ओळीत ’हरवा’ हे संबोधन...
या उत्तर भारतीय भाषेचं हेच लेणं आहे..आपल्याकडे ’प्रिय’, ’प्रियतम’ आणि त्यांच्याकडे ’मनवा’, ’मितवा’, ’हरवा’..
च्यायला...नुसत्या उच्चारानेच लडीवाळ वाटतं...
याउलट ’प्रिय’ बोलताना हातचं राखून ठेवल्यासारखं वाटतं...
ही विरहीणीची कैफ़ीयत आहे हे तर उघडच अहे पण ती पुरुषाच्या आवाजात ऐकताना कसली अवीट गोड वाटते!!!
हीच जर एखाद्या स्त्री गायिकेनं गायली असती तर खूप 'Obvious' वाटत राहीलं असतं ..नाही???
केवळ हेच गाणं नाही तर हा प्रत्यय आपल्याला कैलाश च्या ’तेरी दिवानी’ आणि नुसरत फ़तेह अली खान यांच्या ’पिया रे’ मधून पण आलेला आहेच की!
स्त्रीत्वाचे वेगवेगळे आविष्कार पुरुषाच्या आवाजात ऐकायला मिळाले तर अधिक परिणामकारकरित्या पोहोचतात हा माझा अनुभव आहे..

आता थोडंसं या गाण्याच्या जनकांबद्दल!!

'Fuzon' इति 'Fusion' हा पाकीस्तानी बॅंड आहे...इम्रान,शालेम आणि शफ़कत या त्रिकूटाचा..
ही मंडळी पूर्वीय संगीत आणि पाश्चिमात्य वाद्यं यांचं म्हणजेच मेळ घालण्यात रस दाखवतात..
शालेम स्ट्रिंग गिटार वाजवतो..इम्रान keyboardवर आहे तर शफ़कत हा गायक आहे...
आईशप्पथ तुम्हाला सांगते..गाणं ऐकताना मला फ़क्त guitarचा आवाज ओळखू आला..बाकी मध्येच आपल्या दक्षिणेकडे वाजवतात तसा मडक्यावरचा आवाज आला...मध्येच ड्रम ऐकू येत होता..
पण..
या सर्व percussionsचा (तालवाद्यांचा) परिणाम साधायचं काम इम्रानचा keyboard करतोय म्हटल्यावर मी आश्चर्याने ’आ’च वासला!
इम्रान ने keyboardवर काय मज्जा मज्जा केलीये हे अनुभवण्याकरता तरी तुम्ही ’मोरा सैया’ ऐकाच...
राहता राहिले ’मोरा सैया’चं शक्तिस्थान...शफ़कत चा आवाज..
शफ़कत अमानत अली खान...
पटियाला घराण्याचे उस्ताद अमानत अली खान यांचे सुपुत्र..
तुम्ही Hydrabad Blues 2 बघितलाय का???त्यात हे गाणं होतं..माझा तो पिक्चर काही कारणाने बघायचा राहून गेला पण या गाण्याच्या निमित्ताने मी तो बघून घेणार आहे
याच शफ़कतने ’कभी अलविदा ना केहना’मधलं ’मितवा’ पण गायलय..आठवलं का???
स्त्रीला गाण्यातून उभी करण्यात भले भले कमी पडले तर हा कालचा बच्चा काय दिवे लावणार???असंच वाटतं...पण..
शफ़कतने हे आव्हान पूर्ण ताकदीनिशी पेललंय..
’मोरा सैया’ मधल्या ’मो’ वर इतकी लाडीक लकेर आहे की आपल्याही नकळत आपल्याला गुदगुल्या होतात...
’बोले ना’ वर तर इतक्या हरकती घेतल्यात की बास्स..आमची काहीही हरकत नाही असंच म्हणावंस वाटतं...
गुणगुणायलाही कठीण असं हे गाणं शफ़कत अगदी लीलया गातो...
तर...
गिटारच्या प्रत्येक झणत्काराबरोबर अधिकाधिक गहिरं आणि प्रकटशील होत जाणारं हे गाणं...’मोरा सैया’...
ज्यांना ’संगीत’ आवडतं अशा कानसेनांसाठी एक पर्वणी...!!!

(ताजा कलम:
’प्रिय’ला नाही आवडलं.. bore आहे म्हणाला..
वास्तविक चूक माझीच आहे...
ढिनचॅक आणि ढॅटढॅण गाणी आवडणारया ’प्रिय’ला मी ’मोरा सैय्या’ ऐकवायला गेले...)

10 comments:

Abhijit Bathe said...

मला गाण्यातलं काही कळत नाही (म्हणुन मी त्याबद्दलचे लेखही वाचत नाही). पण हा वाचला. चांगला लिहिलायस - त्यामुळे नुसता वाचवलाच गेला नाही तर ’मोरा सैय्या’ शोधुन ऐकावंसंही वाटलं.
Keep it up.

a Sane man said...

mast lihilays...mazahi he ek bhayankar aavaData gaNa aahe!

Prashant said...

’मोरा सैय्या’ गाणे शोधून ऐकले ....मस्तच आहे
’एकेक पान गळावया’ जास्त आवडलं नाही पण थोडस विचार करायला नक्की लावलं

Shraddha Bhowad said...

मला fuzon वाल्यांनी पब्लिसिटीवर नेमायला हवे ना???
छानच आहे ’मोरा सैय्या’..
संगीताचा ’कान’ असलेल्या प्रत्येकाला आवडेल असंच..

HAREKRISHNAJI said...

My God.

I must take your blog seriously and read it throughly.

आदित्य said...

मी हे गाणे बरंच आधी ऐकलेलं आणि तेव्हापासून ते कितीतरी वेळा ऐकलंय. अवीट गोड!(तुमचाच शब्द). पण गाणे जितके सुंदर आहे तितकाच हा लेखही! खूपच छान!
आणि मला तर अगदी खरंच वाटलेलं की या गाण्यात मागे जो आवाज आहे तो घटम किंवा अशाच कशाचा तरी आहे. फक्त कीबोर्ड यावर अजून विश्वास नाही बसत.
पण ही सगळी माहिती तुम्हाला मिळाली कुठून? विकी वर पण फ़्यूजन बद्दल फारसं काही नाहीये.

निखल्या said...

'मोरा सैयां'च्या Composition आणि Presentation मध्ये Ambiguity आहे. Composition खमाज मध्ये असलं तरी सादरीकरण सूफ़ी थाटाचं आहे. प्रियकर आणि देवाचं एकत्व हा सूफ़ी गॅंगचा पाया. मग त्यातून वज्द, Extreme Ecstacy वगैरे. सूफी असल्यामूळे ते पुरुष गायकानी म्हणणं हे ओघानी आलंच, त्यात काही नवल नाही. पण Female Vocals असते तर गाणं जबर बोरमारं झालं असतं हे निर्विवाद.असो. 'मोरा सैयां' ऐकताना ब-याचदा तो एकत्वाचा टच जाणवतो. अतिशय साधा Sonata आणि तरी अतिशय Complicated वगैरे आशय हे याचं Nucleus.
मला असं वाटतं की Programmed percussions बरे टाकले असले, तरी अजून Improvise करायला बराच वाव होता.Strings तर केवळ टूकार आहेत. Vocals नादलेस.

तुझ्या लेखाबद्दल बोलायचं झालं तर त्याच्या Genus बद्दल मी थोडा संभ्रमित आहे. रसग्रहण केलं आहे, Reaction नोंदविली आहे की General Perspective मांडला आहे ते कळलं नाही मला.तिन्ही गोष्टी More or less आहेत इकडे-तिकडे, पण अर्थ खूप सोप्या शब्दात चपखल मांडला आहे एवढं नक्की. मी साधारणत: अनुवादाच्या फंदात पडत नाही, जसा लागेल तसा अर्थ घेतो. पण तूझा अनुवादाच्या वाचताना तो कुठेही एकलकोंडा वाटत नाही. तरीही दुस-या Angle चा विचार करून गाणं परत ऐकून पहा असा फूकटचा सल्ला आहे आपला. जागा पण चांगल्या पकडल्या आहेस. एकंदर Write-up छान.

एक चूक सापडलीच.
मूळपद 'मै लाख जतन कर हारी', आणि पुढची ओळ 'लाख जतन कर हार रही' अशी आहे. Repetition नाही.
अर्थानं कसली पल्टी खाल्ली बघ.

Shraddha Bhowad said...

@ आदित्य,

तुमच्या कमेंटबद्दल धन्यवाद...!!
फ़्युजनबद्दल मला एवढी माहिती असण्याची भरपूर कारणे आहेत...
१. मला फ़्युजन आवडते.
२. मी शास्त्रीय संगीत शिकले असल्यामुळे संगीत कळते. त्यामुळे शात्रीय
संगीतापेक्षा फ़्युजन नेमकं कशात वेगळं आहे हे समजते..
३. माझे बरेच मित्र फ़्युजन संगीताचे प्रयोग करतात.
४. फ़्युजन संगीताची पार्श्वभूमी परिक्षांच्या निमित्ताने अभ्यासलेली आहे..
so on and so forth...
एवढ्याश्या माहितीवर एवढा लेख लिहिण्याचं धाडस केलं..
अल्पमतीने लिहिलेलं काहीतरी दुसरयाला आवडावं यासारखं सुख नाही...
असेच कळवत रहा!!

Dk said...

Changle mahiti dilis abhaaree aahe :) gane aikylach hav ata. BTW tu 'Vedant' aiklys ka?

Anonymous said...

हाहाहा. आपल्याला आवडणारी सगळीच गाणी आपल्या प्रिय लाही आवडावीत ही अपेक्षा चूकच नाही का? आता मूडप्रमाणे मला नुसरत, वसंतरावही आवडतात तसाच अल्ताफ राजासुद्धा! प्रिय येडी होईल माझी अशाने!!

बाकी ते पे हरवा मला वाटतं की पिहरवा असं आहे. अर्थ तोच, प्रेमिकासाठी एक लाडिक संबोधन...

असाच.... रंगरेजवा हा शब्द मला भारी आवडतो! :)

 
Designed by Lena