’शब्द-पटा’च्या निमित्ताने..

शब्द-पट म्हणजे कोडं..
पूर्वीचं नमनाला घडाभर तेल घालणारं ’गप्पा-टप्पा-श्रद्धाशी’ हे नाव बदलून हे ठेवण्याचा हेतू मलाही फ़ारसा कळलेला नाही तर तुम्हाला काय सांगणार??
ब्लॉगचं नाव आटोपशीर असावं अशी सूचना मला बरयाच जणांनी केली.त्यामुळे ब्लॉगचं पुन्हा एकदा बारसं होणार हे तर नक्की होतं..
पण शब्द-तरंग...शब्द-वलय...श्रद्धाचा ब्लॉग किंवा विश्व कवितेचे या टाईपच्या नावांचा धसका कम तिटकारा...मग नाव ठेवावे तर काय ठेवावे???
पूर्वी राक्षसांचा प्राण नाही का पक्ष्याच्या डोळ्यात बिळ्यात असायचा तसा माझ्या ब्लॉगचा प्राण हा फ़क्त आणि फ़क्त शब्दांत आहे...त्यामुळे ’शब्द-पट’..
पण मग ’शब्द-पट’च का?
चित्रपट म्हणजे चित्रांच्या साहाय्याने, चित्रांच्या माध्यमातून पुढे सरकत असलेला पट किंवा कथा...चित्रपटाचा प्राण चित्रपटातली हलणारी चित्र!!
बोलपट म्हणजे केवळ बोलांच्या साहाय्याने एका निष्कर्षापर्यंत येऊन पोहोचणारी कथा...बोलपटाचा प्राण त्यातली संवादांची फ़ेक!!
या आपल्यासमोर उलगडणारया पटांमधून (दृक श्राव्य) कोणत्या ना कोणत्यातरी माध्यमातून काही ना काही तरी आपल्यापर्यंत पोहोचवलं जातं...आपल्या हद्याला भिडतं..
मी तो प्रयत्न शब्दांतून करू पाहातेय..
कधी कधी दुर्बोध कोडयागत असलेलं जगणं शब्दांच्या आणि कवितांच्या आधारे सुसह्य करू पाहातेय...
शब्द सहजासहजी मिळत गेले की आणखी एका निर्मितीचा आनंद...दु:ख किंवा गुदमरून टाकणारा आनंद ओकून टाकल्यावर येणारा हल्लखपणा आणि त्याच्या जोडीने येणारी ’पुढे काय?’ची बोच..
आणि नाहीच सापडले शब्द तर??
असह्य तगमग....बोलून दाखवता येत नाही, लिहून काढावे तर नीट मांडता येत नाही..
हा कोंडमारा कधी अनुभवला आहात???
मी अनुभवला आहे आणि मला त्याचे व्यसन जडले आहे..
कसाही जिवाला स्वस्थपणा तो नाहीच मिळत कारण शब्द असे सहजासहजी कोणालाच वश होत नाहीत..
कोडं सोडवताना माझं काय होतं माहीत्येय का???
कोडं सोप्पं असेल आणि एका फ़टक्यात सुटलं तर मला अतिशय आनंद होतोच पण त्याचबरोबर ’हे इतक्यातच सुटलं?” आणखी कठीण असतं तर मजा आली असती’ असे विचारही माझ्या मनात येतात..
आणि उलटपक्षी, तेच कोडं कठीण असेल आणि एखाद-दुसरा शब्द काही केल्या आठवत नसेल तर मला दिवसभर चैन पडत नाही...’माहीत तर होता का नाही आठवत शिंचा???’ हे माझं वाक्य दोन-तीनदा तरी पडतं.. पुढच्या आवृत्तीत उत्तर बघितले की’ हात्तिच्या...हे उत्तर होतं होय???मला कसं आठवलं नाही काय माहीत?’ही टोचणी...
म्हणजे कसं?
सुटलं तरी रिकामं वाटतं आणि नाही सुटलं तरी बेचैन वाटतं..
माझी अशी अवस्था कविता लिहीताना नेहमी होते...
सुलभ, साध्या-सोप्प्या निर्मितीचा निखळ आनंद मी कधीच घेऊ शकत नाही...
साध्या निर्मितीतून मी अधिक अवघड, अधिक आव्हानात्मक निर्मितीचा विचार करत राहते...
त्यापायी विचार करत राहते..स्वत:ला शिणवत राहते..
कोडी माझ्या आवडीची आणि मी ही काहीशी कोडयासारखी...म्हणून माझ्या कविताही ’शब्द-तरंग’ किंवा ’शब्दावली’ नाहीत. त्या आहेत ’शब्द-पट’..
कोडी सोडवण्यात मग्न श्रद्धाच्या...
तुम्हाला सुटतील असं वाटतंय???वाचून बघा..

गौरी देशपांडे आणि एकेक पान गळावया...

ब्लॉगवर माझ्याबद्दलच लिहायचे झाले तर ते मला आवडणारया काही मोजक्या गोष्टींबद्दल लिहील्याखेरीज पूर्ण होणारच नाही...
गौरी देशपांडे...माझ्या आवडत्या लेखकांपैकी एक..to be very precise...आवडत्या स्त्री-लेखकांपैकी एक..!!
मी इंजिनीयरींग साईडची..त्यामुळे गौरी देशपांडे, म.ना.अदवंत,केतकर,बाबुराव बागुल या लेखकांच्या वाटेला जायचे मला तसे काहीच कारण नव्हते....तसं पाहता मी ’कॉमन मराठी’ माणूस ज्याला मराठी साहित्य समजतो किंवा त्याला जेवढयांबद्दल ऐकून माहीत असते अशी मराठी पुस्तके आधीच खाऊन संपवली होती..(आचार्य अत्रे, पु.ल.देशपांडे,ह.मो.मराठे,आशा बगे वगैरे वगैरे...)...पण..
upsc ला माझा विषय ’मराठी साहित्य’ असल्यामुळे अभ्यासक्रमात जे काही आहे जे किमान एकदातरी मला डोळ्याखालून घालणे आवश्यक होते...आणि मी सुरुवात केली गौरी देशपांडेंच्या ’एकेक पान गळावया’पासून...
गौरी आणि माझी ही पहिली भेट..
गौरीची मी सर्व पुस्तकं वाचलेली आहेत पण हे पुस्तक माझं विशेष आवडतं आहे..
त्यातल्या माधव आणि राधाच्या कथेवर माझा विशेष जीव..कारण त्यातल्या ’माधव’सारखा माझा जोडीदार असावा अशी माझी इच्छा आहे..
तर या कथेवर मी ऑर्कुट्वरच्या गौरी देशपांडे कम्युनिटीवर हा विचार टाकला होता...

मी:
'एकेक पान गळावया' --थोडासा वेगळा विचार...
गौरी देशपांडे यांचे 'एकेक पान गळावया' हे माझ्या आवडत्या पुस्तकांपैकी एक आहे...
त्यातल्या 'एकेक पान गळावया' ही दीर्घ कथा आपल्यापैकी बरयाच जणांना आवडली असेल..
माधव आणि राधा...त्यांच्यातील अभूतपूर्व केमिस्ट्री...वयसापेक्ष प्रेम...एक्मेकांवर असलेली निस्सिम भक्ती..त्यांची intellectuality.... मला खूपच भावते...
आपल्यापैकी अनेक जणींना माधवसारखा जोडीदार मिळावा असेच वाटत असेल..
पण कधी माधव-राधा यांना बाजूला ठेवून अंबू,नीरा आणि गणेशच्या द्रुष्टिने या कथेचा विचार कोणी करून बघितला आहे का??तुम्ही त्यांच्या जागी असता तर??
intellectual असले तरी कधीही पुरेसा सहवास न मिळालेले आई-वडील...त्यांची स्वतंत्र विश्वं..तुम्हाला ही सत्यस्थिती पचवता आली असती का??
राधाची फ़रहादशी असलेली मैत्री पटली असती का??
ही सर्व पात्र फ़क्त पुस्तकात बरी वाटतात??
आणि प्रत्यक्षात उतरली तर पुस्तकात दाखवल्याप्रमाणे गैर-समज आणि संघर्षा शिवाय पर्याय उरणार नाही??
थोडासा वेगळा विचार...

त्यावर खूप रीप्लाय आले...आणि कळले की मला जी गौरी कळली आहे त्याहीपेक्षा वेगळ्या रितीने गौरी अनेकजणांना कळली आहे....असं म्हणतात की लेखनाचं सामर्थ्य हे वाचक त्याच्याशी स्वत:ला किती relate करू शकतात त्यावर असतं...आणि याच मुद्द्यावर गौरी बाजी मारते..गौरीच्या लेखनात प्रत्येक पानावर वाचकाला आपले संघर्ष, आपल्या नात्यांमधला गुंता, चुकलेल्या priorities याचं प्रतिबिंब आढळतं..त्यामुळेच तो त्याच्याही नकळत गौरीचा होऊन जातो..
तर या प्रश्नावर बरेच विचार मांडले गेले ते असे होते..

श्री.अमित यादव:
@श्रद्धा, अशी नाती ’प्रत्यक्षात उतरली’ तर तु म्हणतेस तसं, पुस्तकात दाखवल्याप्रमाणे गैर-समज आणि संघर्षा शिवाय पर्याय उरणार नाही हे खरं आहे.
पण अशी नाती प्रत्यक्षात असतातच की अन तसेच गैर-समज आणि संघर्षही असतात.!
’एकेक...’ मधली पात्र जगावेगळी नाहीत. थोड्याफ़ार फ़रकाने आपल्याही मनात अशीच (राधासारखी) खळबळ, analysis चालुच असतंच सतत..
माधव आणि राधा..त्यांच्यातील अभूतपूर्व chemistry..एकमेकांवर असलेली निस्सिम भक्ती..त्यांची intellectuality...सर्वांनाच भावते.. अन ती तशी आहे म्हनुणच unique आहे..पण..म्हनुण बाकीचेही problems त्यांच्या आयुष्यात आहेत.माधव आणि राधा गोष्टीतलं भावनारं अंग तेच आहे..एकमेकांवर असलेली निस्सिम भक्ती असलेल्यांनं आयुष्यातल्या इतर गोष्टींकडे कानाडोळा झाला तर नवल ते काय.! अर्थात हे माझे मत..पण गौरीला ते मांडायचे नाहीए..
कोणत्याही व्यक्तीच्या growth (पालकांचे, समाजाचे संस्कार वै. या अर्थाने) मध्ये त्या व्यक्तीच्या genotype शिवाय इतर factors (व्यक्ती, समाज, मित्र, मैत्रिणी, पालक, नातेवाईक, निसर्ग वै.) चा किती मोठा वाटा असतो.? राधा स्वःता कशी घडली आहे.? तीचे स्वःताचे आई-वडील कुठे intellectual आहेत.? अगदी आपण स्वःताकडे पाहाताना आपल्याला काय वाटते: मी आज जो/जी आहे (as a personality) तो/ती कशामुळे.? कोणामुळे?गणेश, अंबु किंवा इतर कोणी काय.. ते जसे आहेत त्याला माधव आणि राधा जबाबदार नाहीत. (म्हणजे गणेश अंबु चुक आहेत असं कोणी म्हणत असेल तर..) ते अमुक एका प्रकारे वाढावेत, तसा प्रयत्न राधा-माधवनं केला असता तर गणेश अंबु त्यांच्या आई-बाबांचे भक्त झाले असते?फ़रहद शी मैत्री ही फ़क्त राधाची नव्हती..(तरी फ़रक काय पड्तो म्हणा.!)..अशा मैत्रीमुळे (plactonic or else) कोणाच्या पोटात दुखत असेल तर त्याला राधा तरी काय करणार.!! यामुळॆ संघर्ष व्हायचेच असतील तर कोणीही काय करु शकतं यावर?
पंचवीशी-तीशीत राधा-माधव सारखं पक्क्या मताचे आपण नसतो.. खुप सारा गोंधळ असतो.. योग्य मार्गावर असलो तरी पल्ला लांबचा गाठायचा असतो..अन मग इतरही गोष्टी चालु असतात आयुष्यात.. खुपसे अन महत्वाचे निर्णय घ्यायचे असतात..राधा or माधव शोधयचे असतात..राधा-माधवचा जो genotype आहे तो आपल्याला भावतो..भावते ती त्यांची निर्णयशक्ती..तीच इच्छाशक्ती आयुष्य ’जगण्याची’..भुरळ पाडणारी..दुर्मिळ असणारी..Priorities ठरल्या की so called संघर्षांचा त्रास होत नाही मग..

त्यावर
मी:
तुमच्या मताशी मी सहमत आहेच असं नाही...
तुम्ही म्हणता,"कोणत्याही व्यक्तीच्या growth (पालकांचे, समाजाचे संस्कार वै. या अर्थाने) मध्ये त्या व्यक्तीच्या genotype शिवाय इतर factors (व्यक्ती, समाज, मित्र, मैत्रिणी, पालक, नातेवाईक, निसर्ग वै.) चा किती मोठा वाटा असतो.? राधा स्वःता कशी घडली आहे.? तीचे स्वःताचे आई-वडील कुठे intellectual आहेत.? "
माझे हेच तर म्हणणे आहे..... ह्या पात्रांचा राधाच्या आयुष्यावरचा impact केती हे गौरी देशपांडे कधीच सांगत नाहीत.....
राधा आणि माधव ह्यांचा genotype वेगळा असेलही कदाचित....परंतु....ती आज अशी का आहे?ह्याला तिच्या भोवतालची लोकं अजिबातच कारणीभूत नसतील??पण हे ठरवायला गौरी देशपांडे राधाच्या किंवा माधवच्या भूतकाळाबद्दल काहीच सांगत नाहीत..आपण हे assume करतो.... की काहीतरी असेल ज्यामुळे ती अशी असेल....पण हे 'काहीतरी' म्हणजे काय?
तुम्ही एवढं तर मान्य करता ना....की कुठलाही माणूस हा स्वयंभू नसतो..त्याला कुणीतरी वाढवावं लागतं.....त्याला शिकवावं लागतं... त्याचा genotype कितीही intellectual typeचा असला तरी तो ओळखून त्याला त्या दिशेने घडवावं लागतं...
तुम्ही आज जे काही आहात...किन्वा मी आज जे काही आहे....किन्वा आपण सारे जे काही आहोत...त्यात तुमच्या इतर factors (व्यक्ती, समाज, मित्र, मैत्रिणी, पालक, नातेवाईक, निसर्ग वै.) चा काहीच हात नाही?..
मग त्याला गणेश आणि अंबू,नीरा अपवाद असे असतील???
जेव्हा नवरा बायको दोघांच्याही संमतीने एखाद्या जीवाला जन्म दिला जातो... तेव्हा त्याचं विश्व उभारायला त्याच्या बरोबरीने राहून त्याला मदत करणे हा concept जर एकमेकांवरच्या अतीव प्रेमापायी कमी महत्वाचा वाटत असेल तर हा त्या जीवावरचा अन्यायच आहे नाही का?यांना एकमेकाकरता जगायचे होते मग आमचा अडथळा कशाला???आम्हाला जन्म दिलाच कशाला???ही मुलांची विचारसरणी असल्यास त्यात चूक ते काय???
इतर कोण काय बोलतेय ह्याची पत्रास न बाळगता राधा- फ़रहद ह्यांची मैत्री फ़ुलत राहते.... बरयाच वेळेस बऱ्याच जणांना फ़ाटयावर मारून (जे गौरी देशपांडे यांची नायिका नेहमी करते)...
मुलांच्या वाटेला बरयाचशा वेळेला न आलेल्या आईचे मित्र....आणि तिचे त्यांच्याशी असलेलं intellectual relation... हे पण मुलांनी समजून कसं घ्यावं??
वाटयाला न आलेली आईच कधी कळली नाही...तर तिचे मित्र-मैत्रिणी कसे कळ्णार???...
आणि असं असताना मुलांची विचारसरणी अशी का आहे???अशी खंत नायिकेने करावी हे थोडे आडमुठे वाटते की नाही???असो...
पण गौरी देशपांडे यांच्या कथा 'नायिकाप्रधान' असल्यामुळे ह्या गोष्टींकडे कधी कधी दुर्लक्ष होते... एवढाच बोलायचा मुद्दा आहे.राधा -माधव आयुष्य 'जगतात'.... एकदम कबूल...पण काही गोष्टींना सोयिस्कर रित्या तिलांजली देऊन...यालाच woman emancipation म्हणतात कदाचित..

अमित:
माझ्या मताशी सहमत कशाला व्ह्यायला हवं आहे.!!? व्यक्ती तीतक्या प्रक्रुती...अन तेवढे विचार वेगळे असणारचं की.!! मी पुन्हा तेच उत्तर copy n paste करावं, असं मला वाटतयं...
कोणीही स्वयंभु नसतो; व्यक्ती, समाज, मित्र, मैत्रिणी, पालक, नातेवाईक, निसर्ग वै. सगळे आपपल्या पध्ध्तीने काम करत असतात. मला म्हणायचे होतं की असं असुनही त्या व्यक्ती चा genotype जास्त वरचढ ठरतो... राधा, तु मी जसे आज आहोत त्याला आपला genotype जास्त कारणीभुत आहे...कथेत सगळं कसं सांगणार.!? प्रत्येकाची assumptions वेगवेगळी असणार की...very natural.!!मला गौरी समजली ती तशीच दुर-याच्या मनात कशी काय असेल.? प्रत्येकाचा genotype वेगळा.!!राधा अन माधव नी शोधलेली उत्तरं ही त्यांच्या आयुष्याशी निगडीत होती...चुक बरोबर त्यांना माहीत...त्यांच आयुष्य आपल्या समोर आलं म्हणुन आपली ही discussions.!! आपली उत्तरं आपण शोधायची.!!गौरी देशपांडे यांच्या कथा 'नायिकाप्रधान' असल्यामुळे ह्या गोष्टींकडे कधी कधी दुर्लक्ष होते: अमान्य.!!राधा -माधव आयुष्य 'जगतात'.... एकदम कबूल...पण काही गोष्टींना सोयिस्कर रित्या तिलांजली देऊन... बिलकुल अमान्य.!!!

वंदना:
'ekek paan gaLavya..' madhye mala feminist bedarkarpNa kinva genotypes chya mhttvapeksha- atypical choices madhoon nirmaN hoNarya atypical du:khanbaddl ek significant comment ahe ti jast appeal zali....asankhya maraThi katha,kadmbarya n naTkantun (including naTasamraT)sacheband pddhtine mulanna vaDhvunhi vaTyala alelya du:khanchi vrNne ali ahetch... 'ekek..' che vegLepN ase ki vegLya choices ne ayushy jgNyache Thrvlyavr smor yeNarya du:khanna samore jatanahi vegLa vichar kraycha prytn ... 'jyanchya priorities vegLya ahet tyanna du:kh kahi TLleli nstat - matr tyanna samore jaychi pddht vegLi asu shkte' asech kahise suchvayche asel ka gaurila yatun...?

दीपश्री:
Vandana, I think that is a great observation. is it really a matter of correct or incorrect or whatever for Madhav and Radha? still furhter, i find what she says about Ganesh and Ambu later on much important: she accepts their initial resentment, but is it too much to expect a change in thier perspective as they mature? despite the lifestyle Radha and Madhav choose due to the need for being together, they do model a sense of self-belief for their kids, dont you think so? is it too much to expect them to think abotu this conviction seriously at least after they grow up? so, i think its only a matter of different choices and the repercussions of the same and facing the cosequences, again differently. this is soemthing i find common to most of Gauri's characters. this sense of conviction for whatever they choose in life is a major thread in them. what do you think, folks?

मी:
Vandana, deepashri...
perspective-building needs fat lot of help from what amitji calls them as "factors "...
environment is aloof...deserting...so is the person...
what this book elaborates is what RADHA and MADHAV are…how they stay clinged….their unbreakable faith…only THEM… all things are viewed from THEIR point of view…don’t u think???
what about the others other than the central characters...???
as far as atypical choices are concerened….raising THEIR kids….giving them little bit of time….was NOT INCLUDED in their priorities???
what my point is…RADHA and MADHAV are very genious,atypical,and what you call them as HATAKE persons….and their children definitely deserved to be like them…but our central characters deprive them of all because they just cant give them enough time. due to THEIR need of spending time with each other…
i was just thinking how would radha and madhav would be like...if their parents were like our radha and madhav are just now???They do model a kind of self-belief in their kids…not because kids asked for it….but only because they had no other choice…what else they could do???
do u think its the question of atypical choice or "NO CHOICE" circumstances??

मयूर कोठावळे:
This refers to your views about Madhav & Radha,ya kathebaddal sadhana magzine baryach divasapuru gauri deshpandyache views kahrokhar aarthpurn & marmik aahet tya mahnlya hotya ki ashi couples tyani pahili aahe aaget aani yaat woman emancipation mudda phar gaun aahe...............think about it!!

वंदना:
shraddha
in indian context - a woman's need to spend time with spouse n persuing ones' career can b seen as ignorance towards children.....BUT let us not forget that - upbringing is a verry complex process.... children DO get influenced by many more people n thoughts other than their biological parents......and the tendency to rebel cant b ignored .....so -giving space to each other for growth nd decision making becomes very important

अमित:
This is very important point Vandana.!!Tru that, woman is always blamed for 'her' ignorance...राधाला वाटणारी बोच ही त्यामुळेच असावी.?Yes, upbringing of chindren is not just parents responsibility (!!) (मी कसा वाढलो त्या अनुभवातुन...), rather, i will say, its beyond their control, if they wish to control...

अमिता:
radha ka patat nahi, thodishi ka hoina? pan patat nahi, karan tine mulana vel dila nahi mhanun? pan tichyat khup kahi vegal ahe ki? ha nikash ka hava? rather, tine mulana svatachi persanality devlop karayala purna vav dila, as mhanata yeil ka? ti mulanpeksha jya navaryashi kharach kahitari shabdat n basanar julat tyachyashi hoti, tashi ti asu shakate! ha niyam ahe ka, ki mul jalyavar navaryapeksha mulanmadhech jast guntayach? ani maitribaddal kay bolayach...

वर्षा:
वरती कोणी तरी "राधा स्वःता कशी घडली आहे.? तीचे स्वःताचे आई-वडील कुठे intellectual आहेत.? "असा विचार मांडलाय!Actually story itself narrates about Radha-Madhav's parents!माधवचे वडील: माझ्या मुलाला तुमच्या मुलीशी लग्न करायचे आहे.राधाचे वडील: मला दोन मुली आहेत त्या पैकी कोणती?माधवचे वडील: थांबा. पत्र बघुन सांगतो. राधा !Don't U think this is enough to say from what intellectual backgound they both are from!And I think this the speciality of Gauri......थोडक्यात खुप काही सांगुन जायचे... No nonsense stuff kind.....
---------------------------------------------------------------------------------------------------------

प्रत्येकाचे वेगळे विचार...गौरीच्या लिखाणातून त्यांना काय गवसलं आहे याबद्दलचं पक्कं मत...यामुळे ही चर्चा मला अत्यंत आवडून गेली होती...
गौरी...तिच्या निस्सीम चाहत्यांची तिच्या पुस्तकावरची प्रगल्भ चर्चा...मला मिरवावीशी वाटली नाही तरच नवल...
संपूर्णपणे गौरीलाच...